Black Fungus Infections : कोरोना संसर्गामुळे तुमची दृष्टी कमकुवत होतीये? तुम्हाला ‘हा’ आजार तर नाही ना? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसची दुसरी लाट अनेकांच्या जीवावर बेतत आहे. त्यातच आता कोरोनाबाधित रुग्णांची दृष्टी कमकुवत होत असल्याचे अनेक प्रकार पाहिला मिळत आहेत. या नवा आजाराच्या कचाट्यात अनेकजण सापडत आहेत. त्यामुळे योग्यवेळी उपचार न झाल्याने रुग्णांचा डोळा काढावा लागत आहे किंवा त्यांचा मृत्यू होत आहे. या आजाराचे नाव आहे मिकोर मायकोसिस.

कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाला ब्लॅक फंगस इन्फेक्शन झाल्याचे पाहिला मिळाले आहे. फंगल इन्फेक्शन सर्वात आधी कमकुवत इम्युनिटी पॉवर असणाऱ्या लोकांवर हल्ला करतो. उपचारादरम्यान दिले जाणारे औषधेही शरीरावर दुष्परिणाम करु शकतात. जर रुग्णाला मधुमेह असेल तर आजारी होण्याचा धोका सर्वात जास्त असतो.

काय आहेत याची लक्षणे?

ब्लॅक फंगस इन्फेक्शन हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते.

कोणाला याचा धोका जास्त?

फंगल इन्फेक्शन सर्वात आधी कमकुवत इम्युनिटी पॉवर असणाऱ्या लोकांवर हल्ला करतो. उपचारादरम्यान दिले जाणारे औषधेही शरीरावर दुष्परिणाम करु शकतात. जर रुग्णाला मधुमेह असेल तर आजारी होण्याचा धोका सर्वात जास्त असेल. त्यामुळे असह्य दुखणे, डोळे लाल होणे, वेगाने डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचारांची गरज आहे.

यावर उपाय काय?

ब्लॅक फंगस इन्फेक्शन हा आजार झालेल्या निम्म्या लोकांचा यामध्ये मृत्यू होतो. जर सुरुवातीलाच तुम्हाला या आजाराची माहिती मिळाली तर वेळेत उपचार घेतल्याने त्याचा फायदा होतो. जर तुमचे डोळे, गालावर सूज अशाप्रकारचे लक्षणे दिसली तर बायोप्सीपासून इन्फेक्शनबाबत माहिती घेता येऊ शकते.