Brahmastra Movie Review | ‘ब्रह्मास्त्र’ प्राचीन भारतीय इतिहासाचा आधार घेऊन केलेला एक मोठा प्रयोग, 8 वर्षांची मेहनत, 400 कोटींचे बजेट

मुंबई : Brahmastra Movie Review | ‘ब्रह्मास्त्र : पार्ट वन शिवा’ हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जेवढे याविषयी नकारात्मक आणि द्वेष भावनेतून लिहिले किंवा बोलले गेले तसा हा चित्रपट नक्कीच नाही. तब्बल 400 कोटींपेक्षा जास्त बजेट आणि 8 वर्षांहून जास्त काळ घेऊन दिग्दर्शक अयान मुखर्जीने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत एक मोठा आणि यशस्वी प्रयोग प्रेक्षकांसमोर मांडला आहे हे चित्रपट पाहताना जाणवते. (Brahmastra Movie Review)

अयान हा अत्यंत हुशार दिग्दर्शक आहे हे त्याच्या आधीच्या चित्रपटावरून सुद्धा समजले आहे. कारण ‘ब्रह्मास्त्र’सारख्या खूप मोठा अवाका असलेला चित्रपट त्याने यशस्वीरित्या हाताळला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना पहिल्या दोन दिवसात चित्रपटगृहाकडे खेचण्यात यशस्वी होईल. शिवाय प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाऊ शकते. कारण चित्रपटाचे उत्तम दिग्दर्शन, खिळवून ठेवणारी पटकथा आणि कथेची व्यवस्थीत केलेली मांडणी चित्रपटाला शेवटपर्यंत उत्तमपणे रंगवत जाते. (Brahmastra Movie Review)

चित्रपटात प्राचीन भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील वेगवेगळी अस्त्रे, त्यांची शक्ती, त्यांचा इतिहास आणि या धर्तीवर आजच्या काळात घडणार्‍या विचित्र घडामोडी आपल्यासमोर मांडल्या आहेत. शिवा (रणबीर कपूर) आणि ईशाचे (आलिया भट्ट) वेगळे नाते, शिवाच्या भूतकाळातील काही रहस्य आणि ब्रह्मास्त्रचे महत्व हे अधोरेखित करताना चित्रपट पकड घेतो, ती शेवटपर्यंत.

चित्रपटाचा पूर्वार्ध कथेच्या अत्यंत उत्तम मांडणीमुळे प्रेक्षकांना खुर्चीला जास्त खिळवून ठेवणारा आहे. मध्यंतरनंतर कथानक आपल्यापुढे वेगळ्या पद्धतीने उलगडत जाते. सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. रणबीर आणि अमिताभ बच्चन यांच्यातील नाते खुप चांगल्या पद्धतीने खुलवून दाखवले आहे. मध्यंतरानंतर येणारे अमिताभ बच्चन यांचे पात्र प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. मौनी रॉय, आणि रणबीर कपूर यांनीही चांगले काम केले आहे.

 

पूर्वार्धात कथानक उत्तमरीत्या बांधल्याने मध्यंतर कसा येतो हे प्रेक्षकांना कळतही नाही. नागार्जुन यांचे पात्र आणि त्याच्या नंदीअस्त्राचे काही दृश्ये प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात. सर्वच अस्त्र आणि त्यांची हाताळणी पाहण्यासारखी आहे. एक उत्तम संकल्पना अयानने तयार केली आहे.

चित्रपटाचे पार्श्वसंगीत, संवाद आणि स्पेशल इफेक्ट्स प्रभावी आहेत. चित्रपटाचे पार्श्वसंगीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आधीपासूनच लोकांच्या ओठांवर आहेत. गाण्यांचे सादरीकरणही उत्तम आहे. हुसैन दलाल यांनी लिहिलेले संवाद काळजाला भिडतात.

 

3डी मध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी येणारी काही एनीमेशन्स लक्षवेधक ठरली आहेत. रणबीर कपूर आणि आलियाने उत्तम काम केले आहे.
रणबीरचा भूतकाळ जेव्हा त्याला सतावतो तेव्हाची त्याची एक विशिष्ट लकब चांगली जमली आहे.
आलियाचा अभिनय खुपच सहज आणि सुंदर झाला आहे.
इतर काही पात्र देखील आहेत जी प्रेक्षकांना आवडत आहेत.

ब्रह्मास्त्रमधील वेगवेगळे कंगोरे बारकाईने उलगडले आहेत.
प्राचीन भारतीय संस्कृती आणि त्यामागचा इतिहास हा मोठा विषय ‘ब्रह्मास्त्र’च्या टीमने यशस्वीपणे हाताळण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे.
तुम्हालाही हा चित्रपट पाहायचा असेल तर जवळील चित्रपटगृहात जाऊन तुम्ही ‘ब्रह्मास्त्र : पार्ट वन शिवा’ नक्की बघू शकता.

Web Title :- Brahmastra Movie Review | brahmastra movie review starring bollywood stars ranbir kapoor and alia bhatt

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Khadakwasla Dam | धरणक्षेत्रांत पावसाला सुरूवात ! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौक उड्डाणपूल पाडण्याची पूर्वतयारी आजपासून

Ajit Pawar | ‘नवीन अध्यक्ष झाले की बारामतीत येतात कारण..’ अजित पवारांचा ‘दादा स्टाईल’ बावनकुळेंना टोला

Atul Bhatkhalkar | ‘प्रकरण अगदी वाया गेलेलं आहे… हे तर भोंदू हृदयसम्राट’, भाजप नेत्याची शिवसेनेवर बोचरी टीका