Buldhana Police | दारुच्या नशेत पोलिसाचे पेट्रोलिंग, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने 3 वाहनांना धडक; बुलढाण्यातील विचित्र अपघात

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – ड्रंक अँड ड्राईव्हच्या (Drunk and Drive) केसेस पोलीस प्रशासनाच्या (Buldhana Police) वतीने केल्या जातात. याबाबत पोलीस प्रशासनाकडून (Maharashtra Police) मोठी जनजागृती देखील केली जते. मात्र, हा नियम फक्त सर्वसामान्यांना आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काल रात्री बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana Police) खामगाव शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (Shivaji Nagar Police Station, Khamgaon) हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्याच्या वाहनाचा अपघात झाला. निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या कर्मचाऱ्याने तीन वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या (Buldhana Police) वाहनाचा अपघात झाला. रात्री पेट्रोलिंग (Patrolling) करत असताना हा अपघात झाला. पोलिसाच्या वाहनाने तीन वाहनांना धडक दिली. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून या पोलीस कर्मचाऱ्याने तीन वाहनांना धडक दिली. कैलास हटकर (Kailas Hatkar) असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून ते खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

असा झाला अपघात

खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कैलास हटकर हे मद्यधुंद अवस्थेत
शेगाव-खामगाव रोडवर (Shegaon-Khamgaon Road) गाडी चालवत होते.
यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांना धडक बसली.
नंतर पोलीस कर्मचाऱ्याची गाडी झाडावर जाऊन आदळली.
गाडीत असलेली एअरबॅग उघडल्याने पोलीस कर्मचारी बचावला.

Web Title :-  Buldhana Police | police vehicle weird accident in buldana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Londhe | ‘फाळणीसाठी काँग्रेस नाहीतर…..’ – अतुल लोंढे

Sandipan Bhumre | ‘कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचे अंबादास दानवेंनी येऊन शोधून दाखवावे’ – संदिपान भुमरे