Cadbury Chocolate | फॅक्ट चेक !भारतात विकल्या जाणार्‍या कॅडबरी चॉकलेटमध्ये ‘बीफ’ असते का? जाणून घ्या ‘सत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Cadbury Chocolate News |कॅडबरी चॉकलेटमध्ये (Cadbury Chocolate) बीफ (Beef) असल्याचा दावा करणार्‍या एका वेबसाइटचा स्क्रीनशॉट विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वायरल होत आहे. यामध्ये म्हटले आहे की, जर एखाद्या उत्पादनात जिलेटिन नावाचे इंग्रेडिएंट असेल तर त्याचा अर्थ आहे की गोमांसचा वापर करून बनवले आहे. वेबसाइटवरून घेतलेला स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार शेयर केला जात आहे.

वेबसाइटवर जारी संदेशात म्हटले आहे की, कृपया लक्ष द्या, जर एखाद्या उत्पादनाच्या साहित्यात जिलेटिन असेल तर ते हलाल प्रमाणित आणि बीफमधून काढले जाते.
भारतात लोकांनी कॅडबरीवर बहिष्कार टाकण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे.
अनेक लोकांनी हा स्क्रीनशॉट शेयर करताना दावा केला आहे की, भारतात विकल्या जाणार्‍या कॅडबरी उत्पादनात गोमांस मिसळले जाते.

मात्र, कंपनीने यावर उत्तर देत म्हटले आहे की, हे पूर्णपणे संभ्रामक आहे.
कारण हे उत्पादन भारताशी संबंधीत नाही. भारतात विकल्या जाणार्‍या प्रॉडक्टमध्ये बीफ किंवा कोणत्याही प्रकारच्या इतर मांसाचा वापर केला जात नाही.
कंपनीने लोकांना कोणताही मेसेज पुढे शेयर करण्यापूर्वी त्यासंबंधीत सत्य व्हेरिफाय करण्याची विनंती केली आहे.

कंपनीने म्हटले, चॉकलेटच्या रॅपरवर हिरव्या रंगाचे सर्कल दर्शवते की, भारतात निर्मित आणि विकल्या जाणारी सर्व उत्पादने 100% शाकाहारी आहेत.
कॅडबरीने म्हटले की, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की अशी नकारात्मक आणि संभ्रामक पोस्ट आमच्या सन्मानित आणि मोठ्या ब्रँडप्रति ग्राहकांचा विश्वास कमी करू शकते.

Web Title : Cadbury Chocolate | cadbury clarifies over beef row says products sold in india dont contain gelatine

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Metro recruitment | मुंबई मेट्रोमध्ये भरती ! इंजिनिअर्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी

Mumbai Police | ‘आम्ही ड्युटीवर आहोत’, म्हणत मुंबई पोलिसांची विशेष कामगिरी; तुफान पावसात जखमी बाप-लेकिला सुरक्षित स्थळी हलवलं (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ‘ओबीसी आरक्षणावर ठाकरे सरकारमध्ये बोलके पोपट रोज बोलतात’