CGBSE 12th Board Exam 2021 : 1 जूनपासून सुरू होत आहेत बोर्ड परीक्षा; घरातून परीक्षा देण्याचे ‘हे’ आहेत नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  छत्तीसगढ माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीजीबीएसई) ने राज्यात 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या(12th Board Exam) आयोजनासंबंधी अनेक निर्देश जारी केले आहेत. माहितीनुसार, परीक्षा केंद्रांवर 1 जून ते 5 जूनच्या दरम्यान इयत्ता 12 वीच्या सर्व परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जे विद्यार्थी या वर्षी छत्तीगढ बोर्ड 12वीची परीक्षामध्ये(12th Board Exam) सहभागी होणार आहेत, ते ठरलेल्या परीक्षा केंद्रावर 1 जूनपासून 5 जूनपर्यंत जाऊन आपल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका घेऊ शकतात.

Video : ‘क्या हुआ तेरा वादा… जयवंतरावजी’; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ म्हणाल्या…

केंद्रांना निर्देश देण्यात आले आहेत की, उत्तर पत्रिका 6 जून ते 10 जूनच्या दरम्यान जमा केल्या जाऊ शकतात. विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर 5 दिवसांच्या आत उत्तरपत्रिका जमा करणे आवश्यक आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरुद्धच्या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

या दरम्यान, जर एखादा विद्यार्थी कोविड-19 व्हायरसने संक्रमित असेल तर त्याच्या ठिकाणी इतर व्यक्तीला संक्रमित उमेदवाराद्वारे परीक्षेसंबंधी माहिती आणि आरटी-पीसीआर टेस्ट रिपोटसह परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एकत्र करण्यासाठी अधिकृत केले जाऊ शकते. अधिकृत व्यक्ति परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याचे प्रवेश पत्र, टेस्ट रिपोर्ट आणि आधार कार्डची एक फोटोकॉपी सादर करून प्रश्न आणि उत्तरपत्रिका घेऊ शकतो.

RBI आणतेय 100 रूपयांची ‘लयभारी’ नवी नोट, जाणून घ्या वैशिष्ट्ये

बोर्डाने अगोदरच माहिती दिली आहे की, जर एखाद्या विद्यार्थ्याने ठरलेल्या कालावधीत उत्तर पत्रिका जमा न केल्यास त्यास परीक्षेला अनुपस्थित मानले जाईल. उत्तर पत्रिका जमा करताना विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती सुद्धा नोंदवायची आहे. लक्षात ठेवा की, पोस्ट किंवा कुरियरच्या माध्यमातून पाठवलेल्या उत्तरपत्रिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

 

Pune : पुण्याच्या कोव्हिड रूग्णालयात धक्कादायक घटना ! कोरोनाबाधितांचे दागिने लंपास, महिलेसह दोघांना अटक

Death in Custody : पोलिस निरीक्षकासह तिघांना अटक तर PSI फरार