Chakan Pimpri Accident News | पिंपरी : रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकची जोरात धडक, युवकाचा जागीच मृत्यू; ट्रक चालकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Chakan Pimpri Accident News | रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची जोरात धडक बसून एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने धडक दिल्याने युवकाच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात मेदनकरवाडी (Medankarwadi) येथे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास झाला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police Station) आरोपी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

ज्ञानेश्वर ऊर्फ माउली सोमनाथ खडे (वय 33, सध्या रा. कडाचीवाडी, ता. खेड, मूळ रा. पिंपळगाव कोजिरा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रकांत शंकर कळसकर (वय 50, रा. मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून ट्रक चालक शंकर सुरेश वायभर (वय 34, सध्या रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) याच्या आयपीसी 279, 304(अ) सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत कळसकर यांचा जावई ज्ञानेश्वर ऊर्फ माउली सोमनाथ खडे
हे मेदनकरवाडी फाटा येथे चाकण – शिक्रापूर रस्ता क्रॉस करत होते. त्यावेळी चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे
जाणारा ट्रकवरील चालक शंकर वायभर याने त्याचे ताब्यातील ट्रक वेगात चालवून खडे यांना जोरात धडक दिली. यामध्ये ते खाली पडल्याने ट्रकचे चाक त्यांचे डोक्यावरून गेले तसेच डावे पायाला गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक गावडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे: सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Chandan Nagar Pune Crime News | पुणे: तुमच्यावर मनी लाँड्रींगची केस! चौकशीची भीती घालून सायबर गुन्हेगारांकडून महिलेला 13 लाखांचा गंडा

Sinhagad Express | मोटरमनने वेगमर्यादा न पाळल्याने सिंहगड एक्सप्रेस पकडताना प्रवाशाचा मृत्यू

Harshvardhan Patil On Sugar Export | साखर उत्पादनाचा अंदाज चुकल्यानेच केंद्राची निर्यातीवर बंदी; हर्षवर्धन पाटलांची कबुली