Chandrapur Lok Sabha | चंद्रपूर मधून विजय वडेट्टीवार, की शिवानी वडेट्टीवार?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन Chandrapur Lok Sabha | चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी, आमदार प्रतिभा धानोरकर, सोबतच आमदार विजय वडेट्टीवार, त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचेही नाव चर्चेत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अहिर यांचा बाळूभाऊ धानोरकरांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी धानोरकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झालेली नाही.(Chandrapur Lok Sabha)

विरोधी पक्षनेते, काॅंग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार इच्छुक असल्याचे त्यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांना सांगितले. त्या म्हणाल्या की, गेली सात- आठ वर्ष मी पक्ष संघटनेत काम करत आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे मुद्दे हाताळले आहेत. युवकांनाही संधी मिळाली पाहिजे म्हणून आपण इच्छुक आहोत .मात्र पक्षाचा निर्णय हा अंतिम असेल असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, भाजपकडून या माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर किंवा राज्य सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळू शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Chandrakant Pulkundwar | पुणे विभागीय लोकशाही दिन संपन्न ! गावातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावा; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे निर्देश

पिंपरी : प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा साठा जप्त, एकाला अटक

Rooftop Solar | रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा ! अनुदानाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन