Changes in Auto Insurance | ऑटो इन्श्युरन्समध्ये मोठा बदल ! नवीन गाडी खरेदी केल्यास ‘बंपर टू बंपर’ विमा (पूर्ण इन्श्यूरन्स) झाला अनिवार्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Changes in Auto Insurance | आता नवीन वाहन विकल्यास त्यावर पूर्ण इन्श्यूरन्स म्हणजे बंपर टू बंपर इन्श्युरन्स (Changes in Auto Insurance) अनिवार्य झाला आहे (Bumper to bumper insurance has mandatory). हा नियम 1 सप्टेंबरपासून लागू होईल. प्रत्यक्षात मद्रास हायकोर्टा (Madras High Court) ने आपल्या आदेशात (order) हे म्हटले आहे. न्यायाल्याने म्हटले की, या पाच वर्षाच्या कालावधीसाठी ड्रायव्हर, पॅसेंजर्स आणि व्हेईकल ओनरला कव्हर करणार्‍या इन्श्युरन्सपेक्षा वेगळा असेल (five-year period would be different from insurance covering drivers, passengers and vehicle owners). बंपर-टू-बंपर इन्श्युरन्समध्ये व्हेईकल फायबर, मेटल आणि रबरच्या पार्टसह 100 टक्केचे कव्हरेज दिले जाईल.

काय म्हटले मद्रास हायकोर्टाने…

मद्रास हायकोर्टचे जस्टिस एस. वैद्यनाथन यांनी आपल्या अलिकडच्या आदेशात म्हटले की, कालावधीत व्हेईकल ओनरने चालक, प्रवाशी, थर्ड पार्टी आणि स्वताचे रक्षण करण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे, जेणेकरून त्यावर कोणतीही अनावश्यक जबाबदारी येऊ नये.

याचिकेला परवानगी दिली

त्यांनी इरोडमध्ये विशेष जिल्हा न्यायालयाच्या मोटर दुर्घटना दावा न्यायाधिकरणच्या 7 डिसेंबर 2019 च्या आदेशाला आव्हान देणार्‍या न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडच्या एका याचिकेला परवानगी दिली.

पॉलिसी थर्ड पार्टीद्वारे वाहनाला नुकसानीसाठी होती

इन्श्युरन्स कंपनीने म्हटले की, पेंडिंग इन्श्युरन्स पॉलिसी केवळ थर्ड पार्टीद्वारे वाहनाला नुकसानीसाठी होती, वाहनात बसलेल्या लोकांसाठी नव्हती.
इन्श्युरन्स कंपनीकडून सांगण्यात आले की, कार ओनरने एक्स्ट्रा प्रीमियम दिल्यास हे कव्हरेज वाढवले जाऊ शकते.

न्यायालयाने व्यक्त केली होती नाराजी

आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले की, हे खुप दुखद आहे की, जेव्हा एखादे वाहन विकले जाते.
तेव्हा खरेदीदाराला पॉलिसीच्या अटी आणि त्याच्या महत्वाबाबत स्पष्टपणे सांगितले जात नाही आणि अशाप्रकारे खरेदीदाराला सुद्धा पॉलिसीचे नियम तसेच अटी जाणून घेण्यात रस नसतो.
कारण तो वाहनाच्या कामगिरीवर जास्त चिंतीत असतो, पॉलिसीबाबत नाही.

 

न्यायालयामुळे तोडगा निघाला

संपूर्ण देशात मोठ्या कालावधीपासून अशाप्रकारच्या इन्श्युरन्सबाबत चर्चा सुरू होती.
ज्यावर ठोस तोडगा निघत नव्हता.
आता मद्रास हायकोर्टाच्या आदेशानंतर अशाप्रकारच्या पॉलिसीची सहजपणे संपूर्ण देशात अंमलबजावणी केली जाऊ शकते.

 

Web Title : Changes in Auto Insurance | big change in auto insurance bumper to bumper insurance became mandatory when buying a new car

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Police Transfer | ‘बिग बी’ अमिताभच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसाची वर्षाला दीड कोटीची कमाई, तडकाफडकी बदली; जाणून घ्या प्रकरण

Nagpur Crime | दोस्त दोस्त ना रहा ! रोज दारूसाठी तगादा लावणाऱ्या मित्राचा मित्रानेच काढला काटा

Pune Crime | तोतया वकिल दाम्पत्याने बनावट रजिस्ट्रेशन करुन केली व्यावसायिकाची 13 लाखांची फसवणूक