Cheating Fraud Case Pimpri | पिंपरी : शेअर्स मार्केटच्या नावाखाली 38 जणांची एक कोटी 12 लाखांची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Cheating Fraud Case Pimpri | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment In Share Market) करण्यासाठी डी-मॅट अकाऊंट काढले असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर काही दिवस परतावा दिला. त्यानंतर परतावा अथवा गुंतवलेली रक्कम परत न करता 38 जणांची तब्बल 1 कोटी 12 लाख 28 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाप-लेकावर गुन्हा दाखल केला आहे.(Cheating Fraud Case Pimpri)

हा प्रकार सन 2015 ते मे 2024 या कालावधीत पूर्णानगर चिखली (Purna Nagar Chikhali) येथे घडला. याप्रकरणी प्रशांत सीताराम खाडे, सीताराम खडे (रा. खटाव, जि. सातारा) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुहास बजरंग शेजवळ (वय 56, रा. तानाजी नगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत व त्याचे वडील सिताराम यांनी एकमेकांशी संगनमत करुन फिर्यादी व
त्याचे सहकारी मित्र इतर 37 जणांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्यादी व इतरांना आम्ही तुमचे शेअर मार्केट मध्ये
पैसे गुंतवणुक करण्यासाठी डी-मॅट अकाउंट काढल्याचे सांगितले.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी फिर्यादीकडून 10 लाख 38 हजार रुपये तर इतर 37 जणांकडून
एक कोटी एक लाख 90 हजार रुपये असे एकूण एक कोटी 12 लाख 28 हजार रुपये रोख आणि चेकद्वारे वेळोवेळी घेतले.
सुरुवातीला फिर्यादी आणि इतर लोकांना काही दिवस परतावा मिळाला.
मात्र त्यांनतर मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यानंतर आरोपींनी परतावा देणे बंद केले.
आरोपींनी डि मॅट अकाउंट न काढता फिर्यादी व त्यांच्या 38 सहकाऱ्यांना डी मॅट अकाउंट ओपन केल्याबाबतचे
एलकेपी कंपनीचे खोटे प्रमाणपत्र देत फसवणूक केली. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baramati Lok Sabha Election 2024 | पुण्यासह 157 मतदान केंद्र संवेदनशील, बारमतीत अनुचित प्रकार घडला तर…; सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र

Ravindra Dhangekar | पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी, इंडीया फ्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन ! नव्या भारतात लोकशाही धोक्यात – डॉ. शशी थरूर