Cheating Fraud Case | पुणे : म्हाडा स्कीममध्ये फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cheating Fraud Case | मुंबई मंत्रालयात (Mantralaya Mumbai) क्लार्क पदावर नोकरी करत असल्याचे ओळखपत्र दाखवून सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरातील म्हाडा स्कीममध्ये फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष (Lure Of Flat In MHADA) दाखवून 28 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखलल करण्यात आला आहे. हा प्रकार 16 फेब्रुवारी 2024 ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत आरोपीच्या आंबेगाव (Ambegaon) येथील घरात घडला आहे.(Cheating Fraud Case)

याबाबत सुषमा अमर भोसले (वय-34 रा. कर्वेनगर, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात
Bharti Vidyapeeth Police Station) फिर्य़ाद दिली आहे.
त्यानुसार सुनिल नामदेव गडकर व त्याची पत्नी किरण सुनिल गडकर (दोघे रा. फ्लॅट नं. 204, गणेश योग बिल्डींग, भिंताडे नगर, आंबेगाव) यांच्यासह अनिता काळे नाव सांगणाऱ्या मोबाईलधारक महिलेवर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील गडकर याने मुंबई मंत्रालयात क्लार्क असल्याचे ओळखपत्र फिर्यादी यांना दाखवले.
आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पतीचा विश्वास संपादन करुन त्यांना म्हाडाच्या स्कीम मधून व्यंकटेश स्काय डेल, राजाराम ब्रिज,
सिंहगड रोड येथे स्पेशल कोट्यातील फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
आरोपी किरण गडकर व अनिता काळे यांनी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली.
फिर्य़ादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून वेगवेगळ्या बँक खात्यात आर.टी.जी.एस, ऑनलाईन स्वरुपात 28 लाख 6 हजार 553
दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी व्यवहार पूर्ण केला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुषमा भोसले यांनी
पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुप्ता करीत आहेत.

दरम्यान, आरोपी सुनिल नामदेव गडकर याच्यावर एप्रिल 2024 मध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
त्याने कसबा पेठेत राहणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या मुलाला एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याचे
आमिष दाखवून तब्बल 69 लाख 70 हजार 742 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”