Chhagan Bhujbal | छगन भुजबळांविरोधात चेंबुर पोलीस ठाण्यात FIR, व्यापारी टेकचंदानीने पाठविले भाषणाचे व्हिडिओ, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि इतर दोन जणांविरोधात मुंबईतील चेंबूर पोलिस ठाण्यात (Chembur Police Station) भारतीय दंडसहिता कलम 506 अंतर्गंत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. धमकी (Threat) दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. चेंबूरमधील व्यापारी ललित टेकचंदानी (Businessman Lalit Tekchandani) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा अज्ञात फोन आल्याने त्यांनी चेंबूर पोलिसात फिर्याद दिली आहे. (Chhagan Bhujbal)

व्यापारी टेकचंदानी याने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मोबाईलवर दोन व्हिडिओ पाठवले होते. ज्यात भुजबळांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते. त्यानंतर टेकचंदानी यांना धमक्या देणारे व्हॉट्सअ‍ॅप कॉल (WhatsApp Messages) आणि मेसेज (WhatsApp Messages) आले. तसेच, शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप टेकचंदानीने केला आहे. यानंतर त्यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

नुकतेच छगन भुजबळ यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात शाळेत लावण्यात येणार्‍या देवी-देवतांच्या प्रतिमांबद्दल वक्तव्य केले होते. शाळेत सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), महात्मा फुले (Mahatma Phule), छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj), बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar), कर्मवीर भाऊराव पाटलांचा (Karmaveer Bhaurao Patil) फोटो लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांनी शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची?

ज्यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, अधिकार मिळाला त्यांची पूजा करा.
हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव मानून पूजा केली पाहिजे. त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे.
बाकीचे देव वैगेरे नंतर बघूया, असे भुजबळ म्हणाले होते.
यावरून भाजपा (BJP) आणि काही ब्राह्मण संघटनांनी (Brahmin Organization) भुजबळ यांच्या वक्तव्यार आक्षेप घेत निषेध केला आहे.
याच भाषणाच्या व्हिडिओवरून टेकचंदानी यांना धमक्या देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title :- Chhagan Bhujbal | fir against ex maha minister chhagan bhujbal 2 others for threatening to kill man

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Minor Girl Rape Case | जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार; सिंहगड रोड परिसरातील घटना

Satara Police | लाच प्रकरणी सातारा पोलीस दलात खळबळ, सहायक पोलीस उपनिरीक्षकाची पदावनती करुन पुन्हा केलं हवालदार