Chinmay Mandlekar | मराठमोळा चिन्मय मांडलेकर दिसणार नव्या भूमिकेत, नव्या लुकने वेधलं सगळ्यांचे लक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठमोळ्या चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) मराठी मालिकांमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्याने फक्त मराठीतच नाहीतर हिंदीतही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याची ‘शिवराज अष्टक’ सिनेमांतील छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिका विशेष गाजली आहे. चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) आता लवकरच पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा नवीन लुक समोर आला आहे.

हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटाची (Sunny Movie) मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) मुख्य भूमिकेत दिसणार असून आता त्यातील एक एक व्यक्तिरेखा समोर येऊ लागल्या आहेत. या चित्रपटाच्या टीझरला चांगला प्रतिसाद मिळाला. ललित प्रभाकर या चित्रपटात ‘सनी’ ही भूमिका साकारणार आहे तर आता या चित्रपटातील विश्वजित मोहिते पाटील (Vishwajit Mohite Patil) या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा समोर आली असून अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हि भूमिका साकारत आहेत.

चिन्मय मांडलेकरने त्याच्या सोशल मीडियावर चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचे पोस्टर रिलीज करत आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली.
यावेळी त्याने लिहिलंय कि, ”सनीचा दादा, सनीसाठी त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विलन.. कपटी माणूस!
पण.. असा एक विलन तर आयुष्यात पाहिजे ना..!” आता हा टिझर पाहून चिन्मयला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी
चाहत्यांची उत्सुकता पणाला लागली आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत,
चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा सिनेमा 18 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title :- Chinmay Mandlekar | chinmay mandlekar will be playing main role in the new marathi film sunny

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Police | 2 महिन्याच्या चिमुकलीचे फूटपाथवरुन अपहरण, मुंबई पोलिसांकडून 12 तासांत आरोपीला अटक; बाळ पुन्हा आईच्या कुशीत

MLA Eknath Khadse | बायकोला साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला, एकनाथ खडसेंचा शहाजीबापूंना टोला