Chowk Marathi Movie | गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘चौक’ची तारीख जाहीर, 12 मे ला होणार प्रदर्शित; महाराष्ट्रातल्या चौकाचौकाची गोष्ट

पोलीसनामा ऑनलाईन – Chowk Marathi Movie | हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड थिएटरच्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाची बॉक्स ऑफिस गुढी उभारण्यात आली. याप्रसंगी मराठी चित्रपटासंबंधित सर्व मान्यवर आणि कलाकार उपस्थित होते. यावेळी दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड (Director Devendra Gaikwad) यांचा आगामी मराठी चित्रपट ‘चौक’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. १२ मे २०२३ रोजी चौक प्रदर्शित होईल. (Chowk Marathi Movie)

‘चौक’च्या निमित्ताने देवेंद्र गायकवाड दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. महाराष्ट्रातल्या चौका-चौकाची गोष्ट ते आपल्यासमोर घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले होते, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ केला. आता या चित्रपटाची तारीख घोषित झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक उंचावली आहे. (Chowk Marathi Movie)

‘मराठी चित्रपटाची बॉक्स ऑफिस गुढी’ या सोहळ्याला रमेश परदेशी, स्नेहल तरडे, सुनिल अभ्यंकर,
संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड, चौक चित्रपटाचे निर्माते दिलीप लालासाहेब पाटील तसेच शुभंकर एकबोटे,
अक्षय टंकसाळे, नितीन सुपेकर, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सुनील महाजन,
सिटीप्राईड ग्रुपचे अध्यक्ष अरविंद चाफळकर, भाजप चित्रपट आघाडीचे अजय नाईक, आर.पी.आय (ए)
चे ऍड. मंदार जोशी उपस्थित होते, लिड मीडियाचे विनोद सातव यांनी सूत्रसंचालन केले.

‘चौक’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांचे असून या चित्रपटाच्या निमित्ताने
ते दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. यापूर्वी त्यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर,
सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती.
यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

Web Title :-Chowk Marathi Movie | Date of ‘Chowk’ announced on the occasion of Gudi Padwa, to be released on May 12; The story of the crossroads in Maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

FIR On NCP Sachin Dodke | राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंविरूध्द गुन्हा दाखल; भाजप सरचिटणीसाला धमकावून कामगारांना केली मारहाण

Pune Crime News | पुण्यात दोन कारवायात 11 लाखांचे अमली पदार्थ जप्त; कॅथा इडुलिस खत, ड्रग्ज प्रथमच पकडले, दोन परदेशी नागरिकांना अटक

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर, अखेर ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवले

Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक