CM Eknath Shinde | ‘त्या’ ST कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून मोठा दिलासा ! उद्धव ठाकरेंचा आणखी एक निर्णय शिंदे सरकार बदलणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप (ST workers Agitation) केला होता. या संपात सहभागी झालेल्या अनेक एसटी कर्मचऱ्यांना तत्कालीन ठाकरे सरकारने (Thackeray Government) निलंबित (Suspended) केले होते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारने (Shinde Government) ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. या निर्णयांद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक प्रकारे शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.

एसटी संप काळात (ST Workers Strike) ठाकरे सरकारने बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एसटी बैठकीत दिले आहेत. संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

पगारवाढ आणि इतर मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास सहा महिने संप पुकारला होता. यावेळी संप मिटवण्यासाठी सरकारकडू वेळोवेळी वाटाघाटी करण्यात आल्या. परंतु त्यानंतरही संप सुरुच होता. कामावर रुजू व्हा अन्यथा कारवाई करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला होता. यानंतर काही कर्मचाऱ्यांना कामावरुन बडतर्फ करण्यात आले होते. या 118 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.

माजी परिवहनमंत्री अनिल परब (Former Transport Minister Anil Parab) यांनी बडतर्फ कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यासाठी त्यांनी अपील करणे गरजेचे आहे.
अपील केल्यानंतर कारवाई मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असे परब यांनी सांगितले होते.
त्यानंतरही अपील करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती.
550 हून अधिक कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाकडे (ST Corporation) अपील केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
परंतु, त्यावेळी 12,596 कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावली होती.
तर 10,275 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते.
या तुलनेत अपील करणाऱ्यांची संख्या फारच कमी होती.

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde change thackeray decision on employees dismissed during st strike

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | पोलीस दल हे इंग्रज काळातील नाही, जनतेचे सेवक म्हणून काम करा; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांना सल्ला

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देणार – दीपक केसरकर