CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांचे पत्र आणि अभियान जखमेवर मीठ चोळणारे, शिक्षणसंस्थाचालक संतापले, ‘परीक्षांवर बहिष्कार’ आंदोलन

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर संतापलेल्या शिक्षण संस्थाचालकांनी (Education Institutions) परीक्षांवर बहिष्कार आंदोलनाची हाक दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व शाळांना पत्र लिहून सर्व विषयांसह विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना पारंगत करणारे शिक्षण शाळांमध्ये देण्यास सांगितले आहे. तसेच माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू केले. यावर शिक्षण संस्थाचालक संतापले असून त्यांच्या संघटनेने परीक्षांवर बहिष्कार आंदोलनाची हाक दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रिय विद्यार्थी मित्रांना अशा मथळ्याचे पत्र शाळांना लिहिले आहे. या पत्रात त्यांनी चांद्रयान-३, विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, शेती, डिजिटल रोबोटिक प्रयोगशाळा, कला-वाणिज्य विषयांसह विविध क्षेत्रात पारंगत करणारे शिक्षण शाळांमधून द्या, असे आवाहन केले आहे.

तसेच माझी शाळा सुंदर शाळा हे अभियानही सुरू केले आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला संतापलेल्या शिक्षण संस्थांचालकांनी विरोध दर्शवत मोहीम उघडली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या पत्रावर संतापलेल्या शिक्षण संस्था महामंडळाने सर्व संस्थांना आवाहन केले आहे की, राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद आहे, विद्याथ्र्यांना शिकवायला त्या-त्या विषयातील पारंगत शिक्षकच उपलब्ध नाहीत, प्रयोगशाळा नाही, इमारती मोडकळीस आल्या असताना मुख्यमंत्र्यांचे पत्र आाणि हे अभियान जखमेवर मीठ चोळणारे आहे. याविरोधात परीक्षांवर बहिष्कार आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

दरम्यान, शिक्षण संस्था महामंडळाने या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद आहे. विद्याथ्र्यांना त्या-त्या विषयातील पारंगत शिक्षकच उपलब्ध नाहीत. डिजिटल, रोबोटिक टिंकरिग प्रयोगाशाळेत इलेक्ट्रॉनिक्स संगणक विषयातील पदवीधर किंवा अभियंता झालेले शिक्षक देण्याची घोषणा केली. पण, कोठेही नियुक्ती नाही.

त्यामुळे विषय शिक्षक शाळेत नसताना विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे स्वप्न दाखविले जात असल्याचा आरोप शिक्षण संस्था महामंडळाने केला. शिकवायला शिक्षक नाहीत, शाळा स्वच्छतेसाठी शिपाई नाहीत, प्रयोगशाळेत परिचर नाहीत, कार्यालयीन कामकाजासाठी लिपिक नाहीत. यासाठी शासनाची धोरणे कारणीभूत आहेत.

सर्व बहुजन समाजाला मिळणारे मोफत व दर्जेदार शिक्षण बंद करण्याचे षडयंत्र रचण्यात येत असून, सर्व शिक्षणक्षेत्र कॉर्पोरेटच्या ताब्यात देऊन शिक्षण विकत घेण्याची व्यवस्था अस्तित्वात येत आहे. शाळा इमारती मोळकळीस आल्या आहेत.

शाळांना कोणत्याही भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी निधी नाही. अशी सर्व विदारक परिस्थिती असताना माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात ५० लाखांचे बक्षीस जाहीर करणे हे न पटणारे आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad PCMC News | नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड पालिकेची कारवाई, 8 वाहने जप्त

डिस्काऊंट देण्याच्या बहाण्याने 52 लाखांची फसवणूक, कोंढवा येथील दाम्पत्यावर FIR