CM Eknath Shinde | ढाल-तलवार चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा गट हा वाद सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) आणि निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) दरबारात न्यायालयाच्या प्रतीक्षेत आहे. त्यावर निवडणूक आयोगाने आगामी अंधेरी येथील पोटनिवडणुका (Andheri East By-Election) लक्षात घेऊन हंगामी आदेश दिला आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Dhanushyaban Symbol) गोठविण्यात आले आहे. तसेच दोनही गटांना म्हणजे ठाकरे आणि शिंदे यांना पक्षाच्या नावाचे आणि चिन्हाचे पर्याय देण्यात आले होते. त्यावर अंमलबजावणी करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव स्वीकारले. आणि त्यांना ‘मशाल’ (Mashal Symbol) ही निवडणूक आणि पक्षाची निशाणी मिळाली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि पक्षचिन्ह म्हणून ‘ढाल – तलवार’ (Shield – Sword Symbol) मिळाली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्य माणसांची शिवसेना, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
सूर्य या चिन्हाला आम्ही पहिली पसंती दिली होती, पण आयोगाने आम्हाला ढाल-तलवार हे चिन्ह दिले,
असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालेले ढाल-तलवार चिन्ह मराठमोळी निशाणी आहे, असे देखील शिंदे म्हणाले.

ढाल-तलवारीचे आम्ही स्वागत केले असून, हे चिन्ह आधीच लोकांच्या घरात पोहोचले आहे.
त्यामुळे आम्हाला आता नव्याने हे चिन्ह घराघरांत पोहचविण्याची गरज नाही, असे शिंदे म्हणाले.

Web Title :- CM Eknath Shinde | The Chief Minister’s first reaction after receiving the shield-sword symbol, said…

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा