Congress Vs BJP | पक्ष, नेते फोडण्यापाठोपाठ आता उमेदवार पळविण्याचा भाजपाचा ‘खेळ’, सूरतनंतर एमपीत काँग्रेस उमेदवाराची माघार, कमळ घेतलं हाती

इंदूर : Congress Vs BJP | प्रमुख विरोधी पक्षाचा उमेदवारच नसेल तर आपला उमेदवार जिंकून येणारच, हे तत्व लक्षात घेऊन भाजपाने आता पक्ष आणि नेते फोडण्यापाठोपाठ निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करणे, अथवा उमेदवार पळवून आपल्या पक्षात घेण्याचा नवीन खेळ सुरू केला आहे. संविधान आणि लोकशाहीत महत्वाची प्रक्रिया असलेल्या निवडणुकीत हा प्रकार आक्षेपार्ह वाटत असला तरी भाजपाने सुरतपाठोपाठ आता इंदूरमधील काँग्रेसच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या पक्षात घेत काँग्रेसला धक्का दिला आहे.(Congress Vs BJP)

इंदूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांति बम (Akshay Kanti Bam) यांनी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. यानंतर अक्षय कांति बम यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी ही माहिती सोशल मीडियावरून फोटोसह दिली आहे.

कैलाश विजयवर्गीय यांनी अक्षय बम यांच्यासह काढलेला सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला असून सोबत लिहिले आहे की,
इंदूर काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांति बम यांचे भाजपात स्वागत आहे.
पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नडड्डा यांच्या नेतृत्वातल्या भाजपाचे कमळ त्यांनी हाती घेतले त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत करतो.

दरम्यान, सूरतमध्ये देखील भाजपाने असाच खेळ केला होता. काही दिवसांपूर्वी सूरत लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांना निकालापूर्वीच बिनविरोध विजेते उमेदवार असे जाहीर केले होते. कारण त्यांचे प्रतिस्पर्धी निलेश कुंभानी यांची उमेदवारी अचानक रद्द करण्यात आली. यावर काँग्रेसने देखील कोणतीही हालचाल केली नाही हे विशेष मानले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe – Shivajirao Adhalrao Patil | निवडणूक प्रचारात कोल्हे-आढळराव आमनेसामने ! हरिनाम सप्ताहात आढळरावांनी ऐकलं डॉ. कोल्हेंच संपुर्ण भाषण

Murlidhar Mohol | पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेपूर्वी मुरलीधर मोहोळ म्हणाले, येत्या काळातदेखील पुण्याच्या विकासासाठी…