Cop Dies Of Heart Attack While On Duty | पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराचा हृदविकाराने मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Cop Dies Of Heart Attack While On Duty | कर्तव्यावर असताना एका पोलीस अंमलदाराला हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना त्या पोलीस अंलदाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.5) निगडी येथे घडली. बाळासाहेब महालींग नंदुर्गे (वय 38) असे मृत्यू झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. (Pimpri Chinchwad Police)

बाळासाहेब नांदुर्गे हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील करंजी गावचे रहिवासी आहेत. पोलीस नाईक नांदुर्गे हे निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) नेणुकीस होते. नांदुर्गे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास कामावर गेले. ‘डायल 112’ हेल्पलाइनवर ते कर्तव्य बजावत होते. दरम्यान, रविवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्याने व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने निगडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी थेरगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरु असताना रविवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.(Cop Dies Of Heart Attack While On Duty)

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

बाळासाहेब नांदुर्गे यांचे मुळगाव आष्टी तालुक्यातील करंजी हे आहे.
नांदुर्गे हे कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. यात त्यांचा मृत्यू झाला.
त्यामुळे नांदुर्गे यांच्यावर त्यांच्या मुळ गावी करंजी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol Rally In Karve Nagar Pune | मुरलीधर मोहोळ यांची कर्वेनगर परिसरात प्रचारफेरी, नागरिकांचा मोठा प्रतिसाद

Murlidhar Mohol Rally In East Pune | पुणे महायुती भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीने पूर्वेकडील पुण्यात पुन्हा संचारला उत्साह