Cryptocurrency ची वाढती लोकप्रियता पाहून आता गुगलने केली मोठी घोषणा ! वॉलेट जाहिरात स्वीकारणार, होईल ‘हा’ फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  क्रिप्टोकरन्सीबाबत (Cryptocurrency) सध्या भारतासह जगभरात मोठा उत्साह आहे. आता बहुतांश लोकांना क्रिप्टोकरन्सीबाबत (Cryptocurrency) जाणून घ्यायचे आहे, त्यामध्ये गुंतवणुकीसाठी इच्छूक आहेत. कारण हे आहे की – कमी कालावधीत नफा. दिग्गज टेक कंपनी गुगलने क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) वाढती लोकप्रियता पाहून आपल्या जाहिरात धोरणात दुरूस्ती करण्याची घोषणा केली आहे. गुगल आता 3 ऑगस्ट 2021 पासून आपल्या प्लॅटफॉर्मवर यूसर्जच्या क्रिप्टोक्यूरन्सी एक्सचेंज आणि डिजिटल वॉलेटच्या जाहिराती स्वीकारण्यास सुरूवात करेल. मात्र, याचा फायदा केवळ यूएसच्या लोकांनाच होईल.

Maharashtra Unlock : ‘राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत, अजून अनलॉक केलेला नाही’ विजय वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण

जागतिक स्तरावर होईल लागू

सर्च इंजिन कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, नवीन नियम केवळ यूएसमध्ये वॉलेटवर लागू होतात, मात्र ते जागतिक स्तरावर जाहिरातींवर लागू होतील.
टेक दिग्गजांनी म्हटले की, ते ऑगस्टमध्ये आपले फायनान्शियल प्रॉडक्ट आणि सेवा धोरण अपडेट करतील.
गुगलच्या नवीन धोरणाचा लाभ घेण्यासाठी क्रिप्टो वॉलेटला FinCEN आणि फेडरल किंवा स्टेट-चार्टर्ड बँकांसोबत रजिस्टर्ड करावे लागेल.

नारायण राणेंचा नाना पटोलेंना थेट इशारा, म्हणाले – ‘परत PM मोदीवर टीका केली तर आम्ही वाजवून टाकू’

आयसीओ जाहिरातींवर प्रतिबंध

मात्र, गुगल अ‍ॅड्सवर इनिशियल कॉईन ऑफरिंग (आयसीओ) च्या जाहिरातींवर प्रतिबंध जारी राहिल.
याशिवाय, DeFi ट्रेडिंग प्रोटोकॉल किंवा जाहिरात ज्या क्रिप्टोकरन्सी किंवा संबंधित उत्पादनांची खरेदी, विक्री किंवा व्यापाराला प्रोत्साहन देत आहेत, त्यांच्यावर सुद्धा प्रतिबंध लावला जाईल.

शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज असे करा हळदीचे सेवन; जाणून घ्या

व्हर्च्युअल करन्सीजच्या किंमतीत तेजी

आज जगातील सर्वात पॉप्युलर क्रिप्टोकरन्सी बिटक्वाईन (Bitcoin) सह तमाम व्हर्च्युअल करन्सीजच्या किंमतीत तेजी आली आहे.
क्रिप्टो मार्केटमध्ये आज जगातील सर्वात टॉप 10 डिजिटल करन्सी हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत.
आज किंमतीत सर्वात जास्त उसळीच्याबाबतीत Binance Coin, Polkadot आणि Dogecoin टॉप गेनर आहे.
Binance Coin च्या किंमतीत आज 10.10% ची उसळी दिसून आली आणि दुपारी 2.30 वाजता ती 418.05 डॉलरवर ट्रेड करत होती.
तर, Dogecoin आज 8.73% च्या तेजीसह 0.426349 डॉलरवर ट्रेड करत आहे.