Biodiesel | आता शिल्लक खाद्यतेलाद्वारे तयार बायो-डिझेलवर धावणार तुमची कार, डिझेलपेक्षा 40 टक्के ‘स्वस्त’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Biodiesel | देशात डिझेलची वाहने वापरणार्‍या लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पेट्रोल (Petrol) चा पर्याय म्हणून सध्या सीएनजी (CNG) आणि एलपीजी (LPG) च्या नंतर आता डिझेलच्या गाड्यांसाठी सुद्धा स्वस्त आणि चांगले इंधन मिळणार आहे.

वापरल्यानंतर शिल्लक राहिलेल्या किंवा जळालेल्या तेलापासून (Used Cooking Oil) बायो-डिझेल (Biodiesel) देशात पहिल्यांदा बनवले गेले आहे, जे डिझेलच्या तुलनेत सुमारे 40-50 टक्के स्वस्त आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रचंड वाढलेल्या असताना बायोडिझेल चांगला पर्याय मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच डेहराडूनच्या सीएसआयआर-भारतीय पेट्रोलियम संस्थेच्या (CSIR-IIP) शास्त्रज्ञांनी सामान्य तापमानावर (Room Temperature) शिल्लक किंवा जळालेल्या खाद्यतेलापासून बायो-डिझेल बनवले आहे.
यास डिझेलचा परवडणारा पर्याय म्हटले जात आहे.

विशेष म्हणजे खाद्यतेल कमाल तीन वेळा वापरले जाऊ शकते.
यानंतर त्याच्यात झालेल्या रिअ‍ॅक्शनमुळे ते विषारी होते आणि खाण्यासाठी उपयोगी राहात नाही.
हे बायोडिझेल प्रदूषण मुक्त इंधन (Pollution Free Fuel) आहे आणि डिझेलप्रमाणे वायुमंडळाचे नुकसान करत नाही.

सीएसआयआर-आयआयपीच्या बायोफ्यूअल डिव्हिजनमधील वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नीरज अत्रे यांनी म्हटले की, बायो-डिझेल भविष्यातील इंधन आहे.
देशातील शास्त्रज्ञ सातत्याने स्वस्त आणि सहज उपलब्ध संसाधनांपासून तयार होणार्‍या उर्जा पर्यायांचा शोध घेत आहेत.

या दरम्यान प्रदूषण स्तर नियंत्रण सुद्धा मोठे आव्हान आहे.
मात्र, बायो-डिझेल या मानकांवर यशस्वी ठरले आहे.
ते सामान्य तापमानावरच अवघ्या पाच मिनिटाच्या प्रोसेसिंगद्वारे बनवले जाऊ शकते.

 

शास्त्रज्ञ डॉ. अत्रे यांनी काय सांगितले…

वापरलेले रिफाईंड व्हेजिटेबल ऑईल हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, घर, कंपन्या इत्यादींमधून भरपूर मिळते.
ज्यावर प्रक्रिया करून बायो-डिझेल बनवले गेले आहे.

नवीन बायो-डिझेल पॉलिसीत भारत सरकारने 2030 पर्यंत डिझेलमध्ये 5 टक्के बायो-डिझेल मिसळण्याची परवानगी दिली आहे.

2024 नंतर देशात तयार होणार्‍या 100 टक्के बायोफ्यूल किंवा बायो-डिझेलवर धावतील.
ऑटोमोबाइल इंडस्ट्री बायो-फ्यूलवर वाहने काढत आहे.

ब्राझीलमध्ये 100 टक्के बायो-डिझेलवर गाड्या चालतात.

सध्या भारतात उरलेल्या खाद्यतेलापासून बायो-डिझेलचे 14-15 प्लांट आहेत.
यामध्ये 1.2 मिलियन टन वार्षिक बायो-डिझेल तयार होते.

बायो-डिझेल बनवण्यासाठी आयआयपीला 30 रुपये प्रति किलोग्रॅमने वापरलेले कुकिंग ऑईल मिळत आहे. प्रोसेसिंगवर 16-17 रुपये खर्च होतात. यामुळे 47 रुपयात तयार होते.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने यूज्ड कुकिंग ऑईलपासून बनवलेल्या बायो-डिझेलसाठी 52 रुपये 50 पैसे किंमत ठरवली आहे.

 

Web Title : csir iip dehradun starts production of biodiesel from used cooking oil in india which is cheaper than diesel in cars

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, आता आईचा शॉक लागून मृत्यू; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Virgin Hyperloop | केवळ 1 तास 22 मिनिटाचा असेल दिल्ली ते मुंबई प्रवास, येतीय जबरदस्त टेक्नॉलॉजी, जाणून घ्या कशी करणार काम?

Mumbai Police | वस्तू गहाळ झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार देताना अ‍ॅफिडेव्हिटची गरज नाही, मागणी केल्यास होणार कारवाई