Cyrus Mistry Accidental Death – insurance Claims | सीट बेल्ट लावला नसेल तर इन्शुरन्स क्लेम नाकारला जाऊ शकतो का? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट

नवी दिल्ली : Cyrus Mistry Accidental Death – insurance Claims | टाटा सन्सचे (Tata Sons) माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याने अपघात प्रकरणांमध्ये विमा दाव्यांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. असाच प्रश्न आहे, जर एखाद्या मानवी चुकीमुळे अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला किंवा कोणी गंभीर जखमी झाले तर अशा प्रकरणात सुद्धा इन्श्युरन्स क्लेम करता येईल का? (Cyrus Mistry Accidental Death – insurance Claims)

या प्रकरणात, उद्योगातील कंपन्यांचे म्हणणे आहे की जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी विमा खरेदी केला जातो, मग त्यामागे मानवी चूक असो किंवा आणखी काही. मानवी चूक किंवा नियमांचे उल्लंघन झाले तरी विमा पॉलिसीचे संपूर्ण लाभ मिळत राहतील आणि अपघाती मृत्यूचे दावे स्वीकारले जातील, असे इंडस्ट्रीचे म्हणणे आहे. मात्र, अपवादात्मक प्रकरणांमध्ये नुकसान भरपाईची रक्कम कमी केली जाऊ शकते.

निष्काळजीपणामुळेच होतात दुर्घटना

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे प्रमुख (जोखीम मूल्यांकन आणि दावे) संजय दत्ता म्हणाले,
बहुतेक अपघात मानवी निष्काळजीपणामुळे होतात. पॉलिसी खरेदी केल्यानंतर निष्काळजीपणामुळे उद्भवणारे अपघात देखील त्याच्या कक्षेत येतात.

पॉलिसीच्या कक्षेत येते सर्व

बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक तपन सिंघला म्हणाले, विमाधारकाकडे सर्वसमावेशक मोटर विमा पॉलिसी असल्यास, त्याच्या अटींनुसार वाहनाचे नुकसान झाल्यास पेमेंट केले जाईल.
याशिवाय, वाहनात असलेल्या लोकांना होणारा धोकाही पॉलिसी अंतर्गत समाविष्ट आहे.

नाकारला जाऊ शकत नाही दावा

दुसर्‍या विमा कंपनीच्या एका अधिकार्‍याने सांगितले, जर निष्काळजीपणामुळे एखादी दुर्दैवी घटना घडली तर,
विमा कंपनीला कायदेशीररित्या वाहनाच्या नुकसानीच्या दाव्याचा सन्मान करणे बंधनकारक आहे.
ते म्हणाले की, मागे बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट घातला होता की नाही या आधारावर दावा फेटाळता येणार नाही.

Web Title :- Cyrus Mistry Accidental Death – insurance Claims | insurance claims independent of human errors industry cyrus mistry accidental death claims

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dussehra Melava | शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा होणार? देवेंद्र फडणवीसांचे पुण्यात सूचक वक्तव्य