Dada Bhuse | अवकाळीने झालेल्या पिक नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करावेत – दादाजी भुसे

नाशिक : Dada Bhuse | अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचानाम्याचे 50 टक्के काम पूर्ण झालेले असून, येत्या दोन दिवसांत उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिले आहेत.

आज दिंडोरी तालुक्यात गारपीटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पालकमंत्री दादा भुसे यांनी केली पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या पाहणीच्या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे (Vivek Sonwane), तहसीलदार पंकज पवार (Tehsildar Pankaj Pawar), गट विकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, माजी आमदार धनराज महाले, अनिल कदम यांच्यसह शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री दादा भुसे यांनी आज दिंडोरी तालुक्यातील कुरनोली, मोहाडी, खडक सुकेने,चिंचखेड,
जोपुळ परिसरातील द्राक्ष बाग व इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
पाहणी दरम्यान काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर केलेल्या अच्छादनामुळे त्यांचे गारपीटीमुळे होणारे नुकसान टळल्याचे निदर्शनास आले.
पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या या प्रयोगशीलतेचे कौतुक करीत येणाऱ्या काळात शासनस्तरावरही
द्राक्ष बागांचे नुकसान टाळण्यासाठी संरक्षित अच्छादनासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असेही भुसे (Dada Bhuse) यांनी यावेळी सांगितले.

पाहणी दरम्यान ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती सातबारावर पिककर्जांची नोंद आहे,
अशा शेतकऱ्यांकडून जिल्हा सहकारी बँकेने (District Cooperative Bank) पीककर्जाची सक्तीने वसूली करू नये,
असे निर्देशही यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा सहकारी बँक अधिकाऱ्यांना दिले.

Web Title :-Dada Bhuse | Panchnama should be completed in the next two days for crop damage due to unseasonal weather

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या युवकासह मित्रावर कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न

Vikram Gokhale Health Update | विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

Ved Teaser | रितेश आणि जेनेलियाच्या नव्या चित्रपटाचा टीझर रिलीज; अभिनेता अक्षय कुमारच्या ट्विटने वेधले सगळ्यांचे लक्ष