Dapodi Pune Crime News | पिंपरी : अतिक्रमण कारवाईला विरोध करुन महिला सुरक्षा रक्षकांचा विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Dapodi Pune Crime News | रस्त्यावर अतिक्रमण (Encroachment On The Road) करुन विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना विरोध केला. तसेच कारवाई पथकासोबत असेलेल्या दोन महिला सुरक्षा रक्षक यांना मारहाण करुन विनयभंग केला (Molestation Case). हा प्रकार दापोडी रेल्वेगेट (Dapodi Railway Gate) येथे शुक्रवारी (दि.14) दुपारी बाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) कासारवाडी (Kasarwadi Ward Office PCMC) येथील ह क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक सचिन विष्णु भारती (वय-25) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रेश्मा कांबळे व तिच्या मुलावार आयपीसी 353, 354(अ)स 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील ह क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक म्हणून कार्य़रत आहेत. शुक्रवारी दुपारी दापोडी येथील रेल्वेगेट येथे रस्त्यावर अनाधिकृत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत होती. पथकाकडून कारवाई सुरु असताना रेश्मा कांबळे हिने महिला सुरक्षा रक्षक यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली.

तसेच रेश्मा कांबळे यांच्या मुलाने दुसऱ्या एका महिला सुरक्षा रक्षकाच्या अंगावरील शासकीय गणवेशाची गच्ची पकडून
स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच मारहाण करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
सचिन भारती यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दोघांवर मारहाण, विनयभंग, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी
गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gautam Adani | गौतम अदानी यांनी खरेदी केली आणखी एक सीमेंट कंपनी, 10442 कोटीत डील फायनल; काय आहे पूर्ण प्‍लान?

NDA Modi Govt | स्वयंपाक घरासाठी गुड न्यूज, आता भाज्यांवर लक्ष ठेवणार सरकार, भाव वाढल्यास हस्तक्षेप करणार

Lonikand Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार