Dearness Allowance | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! तब्बल ‘एवढया’ महिन्यांचा महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणांच्या तोंडावर राज्य सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. सणांच्या तोंडावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या (State Govt Employees) महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 5 महिन्याच्या कालावधीमधील 5 टक्के महागाई भत्ता वाढीच्या (Dearness Allowance) थकबाकीची रक्कम ऑक्टोबर 2021 च्या वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! दसरा, दिवाळी सणाच्या तोंडावर महागाई भत्त्यात 11 % वाढ 

 

 

4 जानेवारी 2020 नुसार राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा
दर 1 जुलै 2019 पासून 12 टक्के वरुन 17 टक्के करण्यात आला आहे.
1 डिसेंबर 2019 पासून सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच या सुधारणेनुसार थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहेत.

राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 या 5 महिन्यांच्या कालावधीतील 5 टक्के महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम ऑक्टोबरच्या वेतनासोबत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance Increase) 17 टक्क्यांवरुन 28 टक्के करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) घेतला आहे. 1 जुलै 2021 पासून हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे.
जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत लवकरच आदेश जारी होणार आहेत.

 

Web Title : Dearness Allowance | Great news for government employees! Approved the arrears of dearness allowance increase for ‘so many’ months

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 2,413 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Income Tax Department Raid | अजित पवारांना मोठा धक्का ! मुलगा पार्थ यांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

ITR filing | SBI ग्राहकांसाठी खुशखबर ! आता मोफत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, जाणून घ्या प्रक्रिया