Deccan Education Society (DES) | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Deccan Education Society (DES) | शनिवारी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. फुग्यांची कमान, रंगीबेरंगी झिरमिळ्या, मुलांसाठी पायघड्या, औक्षणाचे तबक ,सनई ,बालगीते यामुळे वातावरण चैतन्यमयी झाले होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी छोटा भीम आणि डोरेमोन यांनी हजेरी लावली होती.

स्वागत कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुण्या सौ.मेधा ताडपत्रे,शाळा समिती अध्यक्ष श्री.राजेंद्र जोग सर, शाला समिती सदस्या ॲड. राजश्री ठकार, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ.कल्पना वाघ यांनी विद्यार्थ्यांना औक्षण केले.त्यांना गोड खाऊ भरवला.फुलांच्या पायघड्या वरून मुलांनी वर्गात प्रवेश केला. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रार्थना, श्लोक, समूहगीते झाल्यावर मुलांना पाठ्यपुस्तके,फुगे,गुलाबाची फुले,भेटवस्तू देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

माझे शाळेतील पहिले पाऊल या शासनाच्या उपक्रमानुसार इयत्ता पहिलीतील प्रत्येक मुलाच्या पावलाचे कागदावर ठसे घेण्यात आले. प्रमुख पाहुण्या मेधा ताडपत्रे, शाळा समिती अध्यक्ष श्री. राजेंद्र जोग सर व शाला समिती सदस्या ॲड.राजश्री ठकार यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या , “दररोज अभ्यास, व्यायाम करा,खूप मजा करा.आनंदी रहा.” असा संदेश दिला. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी शाळा पुन्हा किलबिलाटाने गजबजलेल्या मुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यात नवीन उत्साह आल्याचे सांगितले. सौ. स्वाती यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सौ. योगिता भावकर यांनी आभार मानले.ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने,धनंजय तळपे यांनी नियोजन केले.शाळेने तयार केलेल्या खास सेल्फी पॉइंट जवळ विद्यार्थी व पालकांनी फोटोसेशनही केले. सर्व मुलांना बुंदीचा लाडू खाऊ म्हणून देण्यात आला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prithviraj Chavan – Maharashtra Assembly Elections | नाना पटोलेंच्या अनुपस्थितीत पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा; म्हणाले – “आगामी विधानसभा निवडणूका…”

Dapodi Pune Crime News | पिंपरी : अतिक्रमण कारवाईला विरोध करुन महिला सुरक्षा रक्षकांचा विनयभंग

Manoj Jarange Patil-Maratha Reservation Andolan | मराठा आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटींचा आकडा, जरांगे म्हणाले – “नावाचा वापर करून पैसे लुटण्याचे काम…”