Delnaaz Irani | शाहरुख खानच्या ‘कल हो ना हो’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केली मनातील खंत

पोलीसनामा ऑनलाइन : Delnaaz Irani | आजकाल अनेक अभिनेत्री अभिनेता इंडस्ट्रीमध्ये काम मिळण्यासाठी खुलेआम निवेदन करत आहेत. त्याचाच एक प्रत्यय म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता यांनी जाहीरपणे काम मिळण्याची विनंती केली होती, तर आता पुन्हा एकदा अभिनेत्री डेलनाज इराणी याच कारणामुळे चर्चेत आहे. कित्येक वर्षांपासून सिनेसृष्टीतून लांब गेलेली अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Delnaaz Irani)

डेलनाजला शाहरुख खानच्या सुपरहिट चित्रपट ‘कल हो ना हो’मधील साकारलेल्या छोट्याशा भूमिकेतून तिला जास्त प्रसिद्धी मिळाली होती. तिच्या या अभिनयाचे सगळीकडून कौतुक होत होते. या चित्रपटानंतर मात्र ती कुठेच दिसली नाही. नुकत्याच तिने दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टींवर भाष्य केले आणि टीकाही केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (Delnaaz Irani)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने म्हटले की, “सध्या सोशल मीडिया स्टार्सना अभिनेत्यांपेक्षा जास्त पसंती दिली जाते. ही खूप मोठी खंताची बाब आहे.
अनेक वर्षे अभिनय क्षेत्राचे शिक्षण घेऊन अभिनेते अभिनेत्री इथे स्ट्रगल करत असतात.
मात्र, ही लोकं रातोरात स्टार्स बनण्याच्या स्वप्नात असतात.
आधी दिग्दर्शक थेट कलाकारांना संपर्क साधायचे मात्र आता तसे होताना दिसत नाही.
मॅनेजर्स, कास्टिंग डायरेक्टर्स यांच्या माध्यमातून संपर्क साधले जातात.
माझ्या अनेक मैत्रिणी आहेत त्यांना सध्या काम मिळणे कठीण झाले आहे कारण कास्टिंग डायरेक्टर्सने त्यांना काम देणे बंदच केले आहे. यामागील कारणदेखील तेवढेच विचित्र आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटला ब्यूटी नसल्याने त्यांना काम मिळत नसल्याचे समोर आले आहे”. डेलनाज सध्या चित्रपटसृष्टीत काम शोधत आहे, त्याचा खुलासा तिने या मुलाखतीत केला आहे.

Web Title :- Delnaaz Irani | bollywood actress delnaaz irani pleads for work comments on social media influencers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sudipto Sen | ‘द केरळ स्टोरी’च्या दिग्दर्शकाची नदाव लॅपिड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया

Aurangabad Crime | मुलीला पळवल्याच्या आरोपावरून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण; औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार

Nashik Crime | पैशांसाठी नातवानेच केली आजी-आजोबांची निर्घृण हत्या; नाशिकमधील प्रकार