DES Navin Marathi Shala Pune | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत योगदिन उत्साहात साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – DES Navin Marathi Shala Pune | बुधवार दिनांक २१जून २०२३ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.शाळा समिती अध्यक्ष डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी ,”आपल्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी नियमित योगासने करावी असे आवाहन केले.तसेच मनाचे आणि शरीराचे आरोग्य जपण्यासाठी योगाचे महत्व सांगितले”.

इयत्ता पहिली ते चौथीच्या सुमारे तेराशे वीस विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार योगासने केली तसेच नियमित योगासने व व्यायाम करण्याचा संकल्प केला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगासने केली.पालकांनीही या उपक्रमाने प्रेरित होऊन योगासने केली व त्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले.भाग्यश्री हजारे यांनी योगदिनाची माहिती सांगितली.रुपाली सावंत यांनी सूत्रसंचालन केले.मनीषा कदम,मीनल कचरे यांनी योगगीत सांगितले.
योगिता भावकर यांनी आभार मानले. तनुजा तिकोने,धनंजय तळपे,सुषमा घडशी यांनी आयोजन केले. (DES Navin Marathi Shala Pune)

Web Title :  DES Navin Marathi Shala Pune | Yoga Day celebrated with enthusiasm in Deccan Education Society’s Navin Marathi Shala

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा