Devrishi Narad Patrkar Samman | ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, अरुण मेहेत्रे, सुषमा नेहरकर, आशुतोष मुगळीकर यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार जाहीर

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या हस्ते शनिवारी पुरस्कारांचे वितरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devrishi Narad Patrkar Samman | विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. १९ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, माध्यमांचे अभ्यासक आणि प्रखर राष्ट्रवादी विचारक शहजाद पूनावाला यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये एका विशेष समारंभात पुरस्कार वितरण होणार आहे. अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्यूकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांनी दिली. याप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ परिषद सदस्य मिलिंद कांबळे उपस्थित होते. (Devrishi Narad Patrkar Samman)

अभय कुलकर्णी पुढे म्हणाले की, या पुरस्कार उपक्रमाचे हे १२ वे वर्ष असून देवर्षी नारद यांच्या नावे हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप ज्येष्ठ पत्रकार यांना २१ हजार रुपये तर अन्य तीन पुरस्कार ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे राहील. (Devrishi Narad Patrkar Samman)

यंदाच्या ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार नगरचे अनिरुद्ध देवचक्के यांची तर अन्य तीन पुरस्कारासाठी अरुण मेहेत्रे, सुषमा नेहरकर, आशुतोष मुगळीकर यांची निवड झाली आहे.

यापूर्वी हे पुरस्कार ’ए बी पी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, ’झी२४ तास’चे डॉ. उदय निरगुडकर, ’तरुण भारत’ बेळगावचे संपादक किरण ठाकूर, ’दिव्य मराठी’चे संपादक प्रशांत दीक्षित, ’महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक पराग करंदीकर, ’लोकसत्ता’ पुण्याचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ पत्रकार कै. दिलीप धारूरकर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर ’आज का आनंद’चे संपादक श्याम अग्रवाल,ज्येष्ठ पत्रकार अभिजित अत्रे, नाशिकच्या देशदूतच्या संपादक वैशाली बालाजीवाले आदींना देण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

हा कार्यक्रम शनिवार दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये
होणार आहे. यावेळी शहजाद पूनावाला यांचे ‘समाजमाध्यम आणि डिजिटल मीडिया युगातील पत्रकारिता’
या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व
नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे असतील. या समारंभास माध्यम क्षेत्रातील पत्रकार व नागरिकांनी मोठ्या
संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी डॉ. रवींद्र आचार्य यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विविध माध्यमांच्या क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या
शिक्षणाच्या संधी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्वायत्त डीईएस पुणे विद्यापीठ या विषयी माहिती दिली.

राष्ट्रीय विचारांनी प्रेरित विश्व संवाद केंद्राचे देशभर कार्य असून विविध राज्यातून ३० केंद्र कार्यरत आहेत.
पुण्यातील केंद्राची स्थापना २०१४ झाली असून पश्चिम महाराष्ट्र हे केंद्राचे कार्यक्षेत्र आहे.
विश्व संवाद केंद्र राष्ट्रीय विचारांच्या प्रसार-प्रचाराचे कार्य करते. त्यासाठी केंद्रातर्फे माध्यमांशी माहितीची देवाणघेवाण
करून समन्वय ठेवला जातो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

17 August Rashifal : सिंह, मकर आणि कुंभ राशीवाल्यांना होईल मोठी ध्येयप्राप्ती, वाचा दैनिक भविष्य

Pune Fire News | वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग; चांदीच्या मूर्तीचा झाला गोळा, लॉकर मात्र वाचले

Post Office | पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉजिटचे व्याजदर वाढले; गुंतवणूक करणे ठरणार फायदेशीर