Digital Currency | भारतात येणार स्वत:ची Digital Currency

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशामध्ये लवकरच स्वत:चं डिजीटल चलन (Digital Currency) येण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) यावर काम करत असल्याची माहिती आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर (Deputy Governor T. Ravishankar) यांनी दिली. RBI टप्प्याटप्प्यानं स्वत:चं डिजीटल चलन (Digital Currency) दाखल करण्याच्या धोरणावर काम करत आहे. ते बाजारात आणण्याच्या प्रक्रियेत आहे. प्रायोगिक तत्वावर घाऊक (Wholesale) आणि किरकोळ (Retail) क्षेत्रात हे चलन दाखल करण्याची योजना असल्याचे टी. रविशंकर यांनी म्हटले.

ते म्हणाले, की सेंट्रल बँक डिजिटील करन्सी CBDC बद्दलची विचारसरणी झाली आहे आणि जगातील अनेक केंद्रीय बँका या संदर्भात काम करत आहे.
भारतातही याबबत गांभीर्यानं काम सुरु आहे.
तसेच कोणत्याही सरकारी मान्यता न मिळालेल्या डिजीटल चलनांपासून ग्राहकांनी सावध रहावे
असेही त्यांनी स्पष्ट केलं.

डीजीटल चलनाची अंमलबजावणी लवकरच

गुरुवारी एका कार्यक्रमात माहिती देताना टी. रविशंकर म्हणाले, देशात लवकरच डिजीटल चलन कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
जगातील इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांप्रमाणेच (Central bank) डिजीटल चलनासंबंधी भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) सुद्धा बऱ्याच काळापासून यावर आधारित वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करत आहे.
देशात रिझर्व्ह बँकेला स्वत:चं डिजीटल चलन सादर करण्याची शिफारस केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

बँकिंग प्रणाली, आर्थिक धोरणावर परिणाम नाही

रिझर्व्ह बँक स्वत:चं डिजीटल चलन टप्प्याटप्प्यानं कार्यान्वित करण्याच्या धोरणावर काम करत आहे.
याचा बँकिंग प्रणाली (Banking System) आणि आर्थिक धोरणावर कोणताही परिणाम होणार नाही अशा पद्धतीने याची अंमलबजावणी केली जाईल, असेही टी. रविशंकर यांनी स्पष्ट केलं.

कायद्यात दुरुस्ती आवश्यक

देशाला स्वत:चं डिजीटल चलन आणण्यासाठी काही कायद्यात दुरुस्ती करणं आवश्यक आहे.
यासाठी फेमा (Foreign Exchange Management Act), नाणी कायदा (Coinage Act)
आणि आयटी कायद्यात (IT Act) देखील सुधारणा करण्याची गरज भासणार असल्याचे टी. रविशंकर यांनी सांगितले.

Web Title : Digital Currency | introduction of indias digital currency soon said deputy governor t ravishankar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Epilepsy | अपस्मारासारख्या आजारावर मात करण्यासाठी नवीन उपचारपध्द्ती – रिजनरेटिव्ह मेडिकल रिसर्चर डॉ. प्रदिप महाजन

Fluid in Lungs | फुफ्फुसात पाणी होण्याच्या समस्येवर उपाय ! करा ‘हे’ 6 घरगुती उपाय, मिळेल आराम; त्रास होईल दूर

Bad Habits | तुम्हाला आजारी पाडतील या 6 सवयी, जाणून घ्या आणि वेळीच व्हा सावध