जर तुम्हीही सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग करताय? तर सावध राहा, बसू शकतो मोठा फटका; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोबाईल फोन वापरताना त्याची बॅटरी अनेकदा डिस्चार्ज होत असते. पण मोबाईल बॅटरी डिस्चार्ज होऊ नये, म्हणून आपण मिळेल त्या ठिकाणी चार्जिंग करण्याचा प्रयत्न करत असतो. पण असे करणे धोक्याचे ठरू शकते. मोबाईल रेल्वे स्टेशन, बस स्टँड यांसारख्या कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी चार्ज करू नये, असे सांगण्यात आले आहे.

मोबाईल चार्जिंग करताना जोडल्या गेलेल्या केबलच्या (वायर) माध्यमातून हॅकर्स तुमचा मोबाईल डाटा लीक करू शकतात. पण हे होते तरी कसे…तर जाणून घेऊया…

हॅकर्स असे करतात…
रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, मॉल या ठिकाणच्या चार्जिंग पॉईंट्सवर अनेकदा मोबाईल दिसतील. या पॉईंट्सवर लावलेल्या USB केबलने तुम्ही फोन चार्ज करत असाल तेव्हा मोबाईलमधील बँक ऍप्स लॉग-इन, फेसबुक, WhatsApp, ट्विटर, जीमेलसह UPI ऍपचा पासवर्ड आणि डाटा हॅकर्सकडे जातो. USB तुमच्या मोबाईलमधील सर्व डाटा कॉपी करते. त्यानंतर हॅकर्स तुमच्या बँकेतील रक्कम काढून घेऊ शकतात.

मालवेअर करतात इन्स्टॉल
इतकेच नाहीतर हॅकर्स USB च्या मदतीने तुमच्या फोनमध्ये व्हायरस इन्स्टॉल करतात. जो फोन चार्जिंग करेलच पण डाटाही कॉपी करेल. किती वेळेचा डाटा चोरायचा आहे त्यानुसार हॅकर्स कुकीजच्या माध्यमातून डाटा हॅक करतील.

असे वाचा त्यापासून…
या अशाप्रकारापासून वाचायचे असल्यास तुम्हाला तुमच्याकडे नेहमी पॉवरबँक असणे गरजेचे आहे किंवा जेव्हा कधी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग करणार असाल तेव्हा स्वत:ची केबल वापरावी. पण जर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये सार्वजनिक ठिकाणीच मोबाईल फोन चार्ज करावा लागणार असेल तर मोबाईल फोन बंद करून करावा. फोन बंद केल्याने डाटा ट्रान्सफर होऊ शकणार नाही.