पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचं बळ वाढणार, धवलसिंह मोहिते-पाटलांची काँग्रेसमध्ये ‘एन्ट्री’

मुंबई : शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय जीवन घालवल्यानंतर आता ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे  डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेस मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेआमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकच वादा धवल दादा‘ अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडला.

शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

डॉ. धवलसिंह यांच्या पक्षप्रवेशावेळी शेकडो समर्थक उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेस पक्ष ही एक विचारधारा डॉ. धवलसिंह

माझ्या वडिलांनी राजकारणाची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली होती. मोहिते पाटील आणि काँग्रेस हे जुने नाते आहे. काँग्रेस पक्ष ही एक विचारधारा आहे. मला नव्याने काम करण्याची संधी मिळाली आहे’’, असे डॉ. मोहिते-पाटील यांनी सांगितले.