Dr. Vijaykumar Gavit | संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार; आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई : Dr. Vijaykumar Gavit | राज्यातील १०० आदिवासी विद्यार्थ्यांना दरवर्षी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी ३१ मार्चपर्यंत अर्ज मागविले जातात. संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या अर्जांची संख्या १०० पेक्षा अधिक प्राप्त झाली, तर विद्यार्थी संख्येवाढ करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijaykumar Gavit) यांनी विधानसभेत सांगितले.

आदिवासी समाजातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरूंच्या राखीव निधीतून देण्यात येणारे अनुदान बंद केल्याबाबतचा प्रश्न सदस्य राजेश एकडे,धनंजय मुंडे,दिलीप वळसे -पाटील यांनी उपस्थित केला होता. (Dr. Vijaykumar Gavit)

आदिवासी मंत्री डॉ. गावित म्हणाले की, सद्यस्थितीत सुरू असलेल्या संशोधन अधिछात्रवृत्तीमध्ये अन्य
विद्या शाखांचा समावेश केला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना दरमहा ३१ हजार रुपये अधिछात्रवृत्ती दिली जाते.
दिव्यांगांना अतिरिक्त दोन हजार रुपये सहाय्य अनुदान दिले जाते.

Web Title : Dr. Vijaykumar Gavit | Increase the number of tribal students for research scholarships; Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Devendra Fadnavis | म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

Pune PMC Property Tax | मिळकतकर सवलतीसाठी पुढील आठवड्यात बैठक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Economic Survey of Maharashtra | ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ अहवाल विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर