Dream Girl 2 | ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरु; ‘गदर 2’ ला देऊ शकणार का लढा?

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील आगामी ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाची हटके कहानी व 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे याचा सिक्वेल देखील प्रेक्षकांची मने जिंकेल अशी आशा निर्मात्यांना आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) हा चित्रपट येत्या 25 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील कलाकार अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) हे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग (Dream Girl 2 Advance Booking) सुरु झाले असून याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटामध्ये पूजा हे आयकॉनिक पात्र साकारणाऱ्या आयुष्मान खुरानाची देखील सध्या सर्वत्र चर्चा आहे. आपल्या जीवंत अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या आयुष्मानचे करिअर देखील या चित्रपटाच्या यशावर अवलंबून आहे. 2019 सालापासून अनेक चित्रपटामध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत मात्र ‘बाला’ या चित्रपटाशिवाय (Bala Movie) त्याचा कोणत्याही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकलेला नाही. अनन्याला देखील आपले अभिनय कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अद्याप 2 दोन बाकी असून ‘ड्रीम गर्ल 2’ साठी अॅडव्हान्स बुकिंग सुरु करण्यात आले आहे.

देशभरामध्ये ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाच्या शो साठी अॅडव्हान्स बुकिंग सुरु आहे.
महत्त्वाच्या शहरांमध्ये या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सध्या सिनेमागृहांमध्ये सनी देओलच्या (Sunny Deol) ‘गदर 2’ (Gadar 2) चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.
पुढचे काही दिवस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राहणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
त्यामुळे ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) चित्रपटाला स्क्रीन मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
पहिल्या दिवशी देशभरात या चित्रपटासाठी जवळपास 8477 तिकिटे बुक झाली आहेत.
अॅडव्हान्स बुकिंगसाठी अजून काही दिवस बाकी उरले असल्याने प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाला
मिळेल अशी आशा निर्मात्यांना आहे. आत्तापर्यंत झालेल्या बुकिंगवरुन हा चित्रपट पहिल्या दिवशी 10.06 कोटींचा
गल्ला जमवू शकतो. यामध्ये मुंबईतून (Mumbai) सुमारे 6 लाख, पुण्यातून (Pune) सुमारे 1 लाख तर बेंगळुरूमधून
(Bangalore) सुमारे 49 हजार आणि हैदराबादमधून (Hyderabad) सुमारे 1.2 लाख रुपयांची तिकटे विक्री झाली आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sakshi Chopra | बिग बॉस 17 मध्ये येणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा; आपल्या रिव्हिलिंग फॅशनसाठी जाते नावाजली