Eknath Khadse | गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

जळगाव: पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसेने आंदोलन केले आहे. गिरीश महाजन यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे दिवंगत पुत्र निखील खडसे यांच्यावर भाष्य केले होते. त्यावरुन एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजन वाद पेटला होता. त्यातून आज राष्ट्रवादीने आंदोलन करत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा निषेध केला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल खडसे यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करून गिरीश महाजन टोकाचे राजकारण करत आहेत. त्यांना खडसेंची बरोबरी करायची असेल, तर त्यांनी विकास कामातून प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केले. तसेच गिरीश महाजन एक जबाबदार व्यक्ती आहेत. ते शासनाचे प्रतिनिधी आहेत. तरी देखील त्यांनी असे बेताल वक्तव्य केले आहे. कोणच्याही कुटुंबियांवर चिखलफेक करणे योग्य नाही. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करत आहोत, असे यावेळी कार्यकर्ते म्हणाले. (Eknath Khadse)

तसेच या निषेध आंदोलनातून गिरीश महाजन धडा घेतील आणि बेताल वक्तव्ये करणार नाहीत.
तरी देखील आगामी काळात त्यांनी अशी बेताल वक्तव्ये केली, तर त्यांना जिल्हाबंदी देखील करण्यात येईल,
असा इशारा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

Web Title :- Eknath Khadse NCP agitation against Girish Mahajan