Esha Deol | हेमा मालिनीची मुलगी ईशा देओल हिचा हटके अंदाज

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol) ही आता पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे. अभिनेता धर्मेद्र (Dharmendra) व अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांची मुलगी (Hema Malini Daughter) ईशा देओल हिने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ईशा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली असून ती आता नवनवीन फोटोशूट करत आहे. या नवीन फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. ईशाचे (Esha Deol) अनेक फोटो व्हायरल झाले असून तिच्या पुन्हा नव्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर आग लागली आहे.

अभिनेत्री ईशा देओल ही आता तिचा सोशल मीडियावरील वावर वाढवत आहे. अनेक पोस्ट ती शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर 2.1 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिचा आता मोठा चाहता वर्ग होत आहे. ती नुकतेच एका मॅगझिनसाठी फोटोशूट (Esha Deol Photoshoot) केले आहे. याची सोशल मीडियावर चर्चा आहे. यामध्ये तिने हेवी सिक्वेन्स असलेला सुंदर बॉडी फिट गाऊन परिधान केला आहे. या डिझायनर ड्रेसमध्ये ईशाचे सौंदर्य खुलले आहे. या ड्रेसच्या स्लिव्ह्ज लक्षवेधी ठरत आहे. तिच्या खांद्यावर फ्रिल वर्क असेलल्या स्लिव्ह्ज आहेत. ईशाने केस मागे बांधलेले असून ज्वेलरीमध्ये फक्त बोटांमध्ये हेव्ही रिंग घातल्या आहेत. ईशा देओलच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा असून तिचा लूक सर्वांना आवडता आहे. यामध्ये ईशाने अगदी आकर्षक पोज दिल्या आहेत.

अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol) हिने ‘कोई मेरे दिल से पुछे’ (Koi Mere Dil Se Poochhe) या चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ना तूम जानो ना हम (Na Tum Jano Na Hum), धूम (Dhoom), नो एंट्री (No Entry), डार्लिंग (Darling) यांसारख्या चित्रपटामध्ये भूमिका साकारली आहे. ती आता सिनेविश्वापासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय आहे. ईशा देओल हिने अनेक वर्षांनंतर पुनरागमन केले असून ती सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) ‘हंटर टूटेगा नही तोडेगा’ (Hunter Tootega Nahi Todega) या वेब सीरिजमध्ये झळकली.

Web Title : Esha Deol | esha deol shared new look in body tight gown

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा