EVM मध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांनी प्रात्यक्षिकासह दाखवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशात असंख्य मतदार ईव्हीएमवर (EVM) अविश्वास दाखवत आहेत. ईव्हीएममध्ये गोंधळ केला जाऊ शकतो अथवा केला जातोय, असा संशय काही मतदार आणि राजकीय पक्ष व्यक्त करत आहेत. यासाठी ईव्हीएम बंद करण्याची मागणी देखील होत आहे. मात्र निवडणूक आयोग अशा तक्रारी ऐकण्यास तयार नाही. आता लोकांच्या मनातील शंकेला पुण्यातील आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे (IT expert Madhav Deshpande) यांनी प्रात्यक्षिकासह दुजोरा दिला आहे. ईव्हीएममध्ये (EVM) गोंधळ करता येऊ शकतो असे देशपांडे यांनी दाखवून दिले आहे.

पुण्यात मराठी विज्ञान परिषदेने शुक्रवारी एस. एम. जोशी सभागृहात ईव्हीएम मशिनमध्ये गोंधळ होऊ शकतो का? या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांनी ईव्हीएम मशिनचे प्रात्यक्षिक दाखवले. कशाप्रकारे मशिनमध्ये चुकीचे सेटिंग करता येऊ शकते, हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले.

ईव्हीएममध्ये काहीही सेटिंग करता येते
यावेळी माधव देशपांडे यांनी म्हटले की, ईव्हीएम (EVM) मशिन हे माणसाने बनवले आहे. त्यामुळे त्यामध्ये काहीही सेटिंग करता येते. एक बटनाऐवजी दोन बटन दाबले तर विशिष्ट व्यक्तीला मत जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशिनचे ऑडिट करायला लावणे आवश्यक आहे.

अत्याधुनिक मशिन हव्यात
माधव देशपांडे यांनी म्हटले की, ईव्हीएममध्ये गोंधळ होऊ नये म्हणून मशिन अत्याधुनिक असाव्यात.
मशिन सुरू कधी झाली, त्याची नोंद दिसायला पाहिजे. ते ऑनलाइन सर्व्हरवर दिसायला पाहिजे.
मशिनमध्ये पहिले मतदान कधी झाले, कोणी केले, त्याची वेळ इत्यादी नमूद झाले पाहिजे.

…तरच पारदर्शक निवडणूक म्हणता येईल
देशपांडे यांनी म्हटले की, एखादा मतदार म्हणाला की, मी दिलेले मतदान ज्याला दिले त्यालाच मिळाले का?
हे तपासायचे आहे. तर ते मशिनमध्ये दिसायला हवे. तरच पारदर्शक निवडणूक झाली, असे म्हणता येऊ शकेल.
दहा मशिनपैकी एका मशिनमध्ये चुकीचे सेटिंग करता येते. सर्वच मशिनमध्ये करायला हवे असे नाही.
त्यामुळे नागरिकांनी निवडणूक आयोगाकडे याविषयी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil on Narayan Rane | नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनोज जरांगेचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आपले आजोबा-पणजोबा…’