चेहर्‍याला चमकदार बनविण्यासाठी किचन आणि गार्डनमधील ‘या’ 3 गोष्टी खुपच प्रभावी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ग्लोईंग स्कीन व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पुरुषांच्या तुलनेने महिलांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक दिसते. मार्केटमध्ये चेहरा ग्लो होण्यासाठी अनेक प्रॉड्क्ट आहेत. पण अशा प्रॉडक्ट्समध्ये केमिकलचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे काही दुष्परिणामही असू शकतात. पण तुमच्या किचन आणि गार्डनमध्ये असलेल्या गोष्टीच तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात.

जर तुम्ही स्क्रब वापरू इच्छित असाल तर तुम्ही पहिल्यांदा एक पॅच टेस्ट हातांवर जरूर करावी. कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स झाले नाही तरच ते तुमच्या चेहऱ्यावर लावावे. पण सध्या अशा काही नैसर्गिक गोष्टी आहेत त्याने तुमच्या चेहऱ्याला फायद्याच्या ठरू शकतात.

कोरफड (ऍलोवेरा) :
कोरफड हा सर्वात स्वस्त आणि चांगला पर्याय असू शकतो. चेहऱ्यासाठी ऍलोवेरा जेल जास्त प्रभावी मानले जाते. मात्र, जर तुमच्याकडे ताजी कोरफड नसेल तर तुम्ही मार्केटमधून ऍलोवेरा जेलचा वापर करू शकता. ऍलोवेरा जेलमध्ये हळद आणि मलई टाकावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावावे. त्यांतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवावा. यानंतर चेहरा ग्लो होऊ लागतो.

टमाटे आणि लिंबू
हे दोन्ही अशा गोष्टी आहेत त्या किचनमध्ये हमखास आढळतात. टमाट्याचा अर्धा तुकडा घेऊन त्याचा रस काढावा आणि त्यानंतर लिंबूचा रस मिसळावा. हे दोन्ही मिक्स करा आणि चेहऱ्यासह मानेवरही लावावा. 20-25 मिनिटांनी चेहरा धुवावा.

दही आणि मध
दह्यात मध मिसळावे आणि याला पाण्यात टाकून किमान 15-20 मिनिटे ठेवावे. सुकल्यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवावा आणि त्यानंतर तुम्हाला काही प्रमाणात फरक जाणवेल.