FIR On Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांची मोठी कारवाई; 80-90 जणांवर 2 ठिकाणी गुन्हे दाखल

हिंगोली : FIR On Manoj Jarange Patil | मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation Andolan) नेते मनोज जरांगे यांच्यावर राज्यभरात गुन्हे दाखल करण्याचा सरकारने सपाटाच लावला आहे. आता हिंगोलीमध्ये (Hingoli) जरांगे यांच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर झालेली ही कारवाई मराठा समाजासाठी धक्कादायक मानली जात आहे.

हिंगोलीच्या वसमत शहर (Wasamat City Police Station) आणि वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात (Wasamat Rural Police Station) मनोज जरांगे पाटील यांच्यासह ८०-९० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनोज जरांगे हे हिंगोलीतील वसमत येथे मराठा समाज संवाद बैठकीसाठी आले असताना विनापरवाना मोटरसायकल
रॅली काढणे, विनापरवाना लाऊड स्पीकर लावणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत.(FIR On Manoj Jarange Patil)

हिंगोलीच्या वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासह सुमारे ७० ते ८० जणांविरोधात तर वसमत
शहर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासह सुमारे १० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM-USHA Scheme | पीएम -उषा योजनेजतर्गत महाराष्ट्राला ७९१.१७ कोटी रुपये मंजूर; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची माहिती

Pimpri Chinchwad Crime | ड्रेनेजमध्ये आढळले पुरुष जातीचे मृत अर्भक, पिंपरीमधील धक्कादायक प्रकार

Pune Lok Sabha – Muralidhar Mohol | माजी महापौर मुरलीधर मोहोळ भाजपचे पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार; जाणून घ्या महाराष्ट्रातील भाजपच्या 20 उमेदवारांची नावे