पोस्टाच्या ‘या’ स्कीममुळे दर महिन्याला खात्यात येतील पैसे; जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS) सरकारी स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. या योजनेनुसार गुंतवणूकदाराला दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळवता येऊ शकते. या योजनेंतर्गत सिंगल किंवा जॉईंट अकाउंटमध्ये एकरकमी पैसे भरावे लागतात. त्या रकमेनुसार, दरमहा तुमच्या खात्यात पैसे येत राहतील.

पोस्टाची ही योजना 5 वर्षांसाठी आहे. पण हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुढेही 5-5 वर्षांसाठी वाढवता येऊ शकतो. पोस्टाची ही योजना असल्याने यामध्ये कोणताही तोटा होणार नाही याची हमी मिळू शकते. तुमच्या रकमेची 100 टक्के गॅरंटी सरकार घेते.

जाणून घ्या काय आहे योजना…

पात्रता काय?

कोणताही भारतीय नागरिक

कोण करू शकतो यामध्ये गुंतवणूक?

जे महिन्याला सुरक्षितरित्या फिक्स्ड इन्कम मिळू इच्छितात. निवृत्तीनंतर एक रक्कम मिळते ही रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. जर तुम्ही इन्स्टॉलमेंटऐवजी एक रकमी रेग्युलर रिटर्न मिळू इच्छित असाल तर हा एक चांगला पर्याय आहे.

जास्तीत जास्त किती गुंतवणूक?

या योजनेंतर्गत सिंगल आणि जॉईंट दोन्ही पद्धतीने खाते उघडता येऊ शकते. सिंगल अकाउंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये तर जॉईंट अकाउंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता.

व्याजदर किती?

मंथली इन्कम स्कीमसाठी 6.6 टक्के वार्षिक व्याज निश्चित केले आहे.

असे उघडा अकाउंट…

–  तुमचे पोस्टात बचत खाते असणे गरजेचे

–  आयडी प्रूफसाठी आधारकार्ड किंवा पासपोर्ट किंवा व्होटरकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स असणे गरजेचे

–  2 पासपोर्ट साईज फोटो

–  लाईट बिल किंवा सरकारकडून जारी केलेले पत्रक ऍड्रेस प्रूफ

–  हे खाते उघडण्यासाठी 1000 रुपये चेक किंवा कॅश भरणे गरजेचे.