Gadar 2 | गदर 2 चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग एका आठवड्यापर्यंत झाले हाऊसफुल; प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

पोलीसनामा ऑनलाइन – Gadar 2 | अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) यांची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. तबब्ल 11 वर्षांनंतर सकीना व तारा सिंह यांची केमिस्ट्री ‘गदर 2’ चित्रपटाच्या (Gadar 2) माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 2001 साली प्रदर्शित झालेला ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar: Ek Prem Kath) या चित्रपटाचा सीक्वेल अर्थात ‘गदर 2’ सिनेमा येत्या 11 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित (Gadar 2 Release Date) होणार आहे. प्रेक्षक आतुरतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग (Gadar 2 Advance Booking) केले जात आहेत. ‘गदर 2’ चित्रपटाच्या या ॲडव्हान्स बुकिंगमुळे पहिल्या आठवड्यात चित्रपटगृह हाऊसफुल झाली आहेत.

बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ सिनेमामध्ये सकीना व तारा यांच्या लव स्टोरी मध्ये पुढे काय घडणार याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत. चित्रपटाच्या गाण्यांना, टीझर व ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे ‘गदर 2’ चित्रपटाचे थिएटर ही आत्ताच हाऊसफुल (Gadar 2 Housefull) झाली आहेत. ‘गदर 2’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा (Director Anil Sharma) यांनी प्रेक्षकांच्या प्रतिसादाची माहिती दिली आहे. अनिल यांनी सोशल मीडियावर ‘गदर 2’ सिनेमाची ॲडव्हान्स बुकिंग फुल होत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरच्या राजमंदिर या थिएटरमधील ‘गदर 2’ चे पूर्ण आठवड्याभराचे शो फुल झाले आहेत. तसेच INOX, PVR आणि इतर मल्टिप्लेक्स मध्ये बुधवारी सायंकाळ पासून ‘गदर 2’ चे ॲडव्हान्स बुकिंग करता येणार आहे. दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना दिलेल्या या प्रेमाबद्दल धन्यवाद मानले आहे.

‘गदर 2’ (Gadar 2 movie) चित्रपटाची घौडदौड प्रदर्शनापूर्वीच सुरु झाली आहे.
सेंसर बोर्डाकडून चित्रपटामध्ये अनेक बदल करण्यास सांगण्यात आले आहे.
प्रेक्षकांना मात्र हा चित्रपट आवडणार असून सनी देओलचा हा सिनेमा
बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज लावला जात आहे.
चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग देखील फुल होत आहे. पहिल्याच दिवशी 1800 तिकिटांची विक्री झाली आहे. तर मूव्हीमॅक्स 700 आणि मिरजमध्ये 500 तिकिटांची विक्री अद्याप झालेली आहे. चित्रपटामध्ये सनी आणि अमिषा बरोबर इतर अनेक नवे चेहरे देखील झळकणार आहे. ‘गदर’ चित्रपटाप्रमाणे ‘गदर 2’ चित्रपट देखील प्रेक्षकांची मने जिंकेल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

N D Mahanor Passes Away | निसर्गकवी ना. धो. महानोर काळाच्या पडद्याआड;
81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास