Gautam Adani Income | ‘बुलेट’च्या स्पीडनं संपत्तीत वाढ ! गौतम अदानी यांनी यावर्षी दररोज कमावले 2000 कोटी रुपये, ‘या’ कंपन्यांमुळे मोठी कमाई

ब्लूमबर्गनुसार गौतम अदानी (Gautam Adani) यांची सध्याची संपत्ती 77 बिलियन डॉलर झाली आहे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्लूमबर्गच्या Bloomberg रिपोर्टनुसर यावर्षी गौतम अदानी यांच्या संपत्तीत 43 बिलियन डॉलर म्हणजे 3.15 लाख कोटी रुपयांची Gautam Adani Income वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये वाढीचे मुख्य कारण त्यांच्या कंपन्यांमध्ये 250 ते 350 टक्केपर्यंत झालेली वाढ आहे. रिपोर्टनुसार त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ वॉरेन बफे Warren Buffett आणि मुकेश अंबानी Mukesh Ambani यांच्या तुलनेत जास्त वेगाने वाढली आहे. गौतम अदानी Gautam Adani हे पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Mod यांचे निकटवर्तीय उद्योगपती म्हणून ओळखले जातात.

संपत्तीमध्ये बुलेटच्या वेगाने वाढ
मागील काही काळापासून जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासोबत गौतम अदानी Gautam Adani यांचे सुद्धा नाव घेतले जाऊ लागले आहे.
त्याचे कारण आहे की, त्यांच्या संपत्तीमध्ये बुलेटच्या वेगाने वाढ होत आहे.
ब्लूमबर्गच्या अलिकडच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, यावर्षी त्यांच्या संपत्तीत 43 बिलियन डॉलर म्हणजे 3.15 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

अंबानी, बफेंपेक्षा जास्त वाढ
अदानींच्या संपत्तीची assets वाढ मुकेश अंबानी आणि जगातील सर्वात मोठ्या गुंतवणुकदारांमध्ये सहभागी वॉरेन बफे यांच्या पेक्षा सुद्धा जास्त आहे.
गौतम अदानी यांच्या संपत्तीत रोज 2 हजार कोटींची वाढ दिसून आली आहे.
जाणून घेवूयात अखेर त्यांच्या संपत्तीमध्ये कोणत्या कंपन्यांचे योगदान राहीले आहे.

रोज 2000 हजार कोटी रुपयांची वाढ
ब्लूमबर्गनुसार गौतम अदानी यांची सध्याची संपत्ती 77 बिलियन डॉलर झाली आहे.
जर ती भारतीय रुपयांमध्ये पाहिली तर 5.62 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
तर वर्षाच्या अगोदर गौतम अदानी यांचे एकुण नेटवर्थ 34 बिलियन डॉलर होते.
या दरम्यान त्यांच्या संपत्तीत 43 बिलियन डॉलर म्हणजे 3.15 लाख कोटी रुपयांची वाढ दिसनू आली म्हणजे गौतम अदानी यांच्या संपत्तीत रोज 2000 हजार कोटी रुपयांची earned rs 2000 crs everyday वाढ दिसून आली.

अखेर संपत्तीत इतकी वाढ का होत आहे
त्यांच्या संपत्तीमधील वाढीचे मुख्य कारण त्यांच्या कंपन्यांच्या शेयर्समध्ये shares झालेली वाढ आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार त्यांची कंपनी अंदानी टोटल गॅसने company Andani Total Gas यावर्षी 330 टक्के वाढ दिली आहे. तर दुसरीकडे अदानी इंटरप्रायजेसच्या शेयरमध्ये 235 टक्केची उसळी दिसून आली आहे. अदानी ट्रान्समिशनच्या शेयरमध्ये आतापर्यंत 263 टक्केच्या तेजी नोंदली गेली आहे. यावर्षी अदानी यांच्या शेयरने गुंतवणुकदारांना investors कमाई करून दिली आहे. जाणकारांनुसार येत्या दिवसा या कंपन्यांच्या शेयरमध्ये आणखी वाढ दिसून येऊ शकते.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात