Gold-Silver Rate | पितृपक्षामुळे देशभरात व्यवसायात 10 टक्के घट, सोने-चांदीत सर्वात जास्त घसरण

नवी दिल्ली : Gold-Silver Rate | पितृपक्ष सुरू होताच व्यवसाय कमी झाला आहे (Business Down In Pitra Paksha) . त्याचा परिणाम काही व्यवसायांवर जास्त तर काहींवर कमी झाला आहे. सोन्या-चांदीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. जवळपास 25 टक्के घट झाली आहे. व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार, लोक आता बुकिंग करून नवरात्रात डिलिव्हरी घेण्याचे बोलत आहेत. पितृपक्षानंतर व्यवसायात तेजी येईल, असा व्यावसायिकांचा विश्वास आहे. पितृपक्षाच्या काळात व्यापारात एकूण 10% घट झाली आहे. (Gold-Silver Rate )

हिंदू धर्मातील सनातन संस्कृतीत 16 दिवसांचा पितृ पंधरवडा मानला जातो. या काळात सर्व प्रकारचे मंगलकार्य, विवाह आणि इतर शुभकार्य केली जात नाहीत. या काळात बहुतांश लोक केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच खरेदी करतात.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, पितृपक्षात एकूण व्यवसाय 10 टक्क्यांनी कमी झाला आहे. याचा सर्वाधिक फटका सोन्या-चांदीच्या व्यवसायाला बसला असून, त्यात 25 टक्क्यांनी घट झाली आहे. कारण शुभकार्यासाठी सोने-चांदीची खरेदी केली जाते आणि पितृपक्षात लोक सोने-चांदी खरेदी करत नाहीत. ते म्हणाले, हे 15 दिवस व्यापार्‍यांसाठी खूप महत्वाचे दिवस असतात, पुढील वर्षभराच्या व्यापाराचे नियोजन या 15/16 दिवसात करायचे असते. (Gold-Silver Rate)

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) चे सीईओ हर्ष दमाणी म्हणाले, पितृपक्षाचा प्रभाव उत्तर भारतात आहे, दक्षिण भारतात विक्रीवर कोणताही परिणाम नाही.
उत्तर भारतात या काळात लोक बुकिंग करत नाहीत, पण ज्यांना नवरात्रीत वाहन हवे आहे त्यांनी आधीच बुकिंग
केलेले आहे. यावेळी, उत्तर भारतात वाहनांची विक्री कमी झाली असली तरी महिनाभराच्या विक्रीवर कोणताही
परिणाम दिसून येत नाही, कारण जे आता डिलिव्हरी घेत नाहीत, ते नवरात्रीमध्ये घेतील.

एनसीआरच्या संत ज्वेलर्सचे मोहित सोनी म्हणाले की, व्यवसायात 50 टक्क्यांहून जास्त घट झाली आहे.
या काळात लोक नवीन वस्तू खरेदी करत नाहीत, ते पसंत करून वस्तु बुक करत आहेत आणि डिलिव्हरी नवरात्री झाल्यानंतर घेत आहेत. असा ट्रेंड दरवर्षी येतो. नवरात्रापासून बाजारपेठेची लगबग सुरू होते.
जी पुढील सहा महिने सुरू राहणार आहे.

त्याचवेळी इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष कुमार जैन म्हणाले की पितृपक्षाचा इथे फारसा
परिणाम होत नाही, कारण मुंबईतील लोक वेळ मिळेल तेव्हा खरेदीसाठी बाहेर पडतात.
याशिवाय आता सोने स्वस्त झाले असून भविष्यात ते महाग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोक सोने खरेदी करत
आहेत.

Web Title :-  Gold Silver Rate | pitra paksha business down gold and silver more effected

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडणे आणि त्यानंतरच्या वाहतुकीबाबत NHAI चा आराखडा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षाच्या तरुणाने 15 वर्षाच्या मुलीला केले गर्भवती; स्वारगेट पोलीस ठाण्यात FIR