Gold-Silver Rate Today | उच्चांकी दरापेक्षा आज सोनं 6 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोन्याच्या किंमतीत वाढ (Gold-Silver Rate Today) झाली की त्याचे परिणाम भारतीय बाजरपेठेवर ही दिसू लागतात. सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate Today) आज वाढ झाली आहे. मात्र उच्चांकी दरापेक्षा आज सोनं 6 हजार रुपयांनी स्वस्त आहे. कोवीड काळात सोन्याची किंमत 56 हजारांवर पोहोचली होती. रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 22 कॅरेट सोन्याची किंमत (22 Carat Gold Price) आज 45 हजार 950 रुपये प्रति 10 गॅम आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 45 हजार 850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती.

गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार चांदी 57 हजार 200 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 56 हजार 700 रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क (Excise Duty), राज्य कर (State Tax) आणि मेकिंग शुल्कामुळे (Making Duty) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

प्रमुख शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर (Gold-Silver Rate Today)

मुंबई – 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 45 हजार 950 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 50 हजार 130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे – पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 980 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50 हजार 130 रुपये आहे.

नागपूर – नागपूर मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 980 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50 हजार 130 रुपये इतका आहे.

नाशिक – नाशिक मध्ये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 980 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50 हजार 130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा आजा प्रति 10 ग्रॅमचा दर 572 रुपये आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

Advt.

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.
जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये
2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

या ठिकाणी करा तक्रार

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप तयार केले आहे.
BIS Care APP द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे केवळ सोन्याची शुद्धता नाही तर
त्याबाबत कोणतीही तक्रार करु शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून
आल्यास ग्राहक त्यासंदर्भात तात्काळ तक्रार करु शकतात.

Web Title :-  Gold-Silver Rate Today | gold silver price on wednesday mumbai pune new rates maharashtra 21 september 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Changes In NPS | NPS नियमांमध्ये झाले 4 मोठे बदल; ई-नामांकनपासून विदड्रॉलपर्यंत का भासली ‘या’ बदलांची गरज

Sanjay Raut | ‘सामना कार्यालयात संजय राऊतांना पैसे घेताना मी पाहिलंय’, मुख्य साक्षीदाराचा खळबळजनक दावा