Google data | तुम्हाला पॉर्न बघण्याची भारतीयांची आवडीची वेळ माहित्येय का? गुगलनं केला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Google Data | सोमवारी रात्री उशीरा मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अटक केली. पोर्नोग्राफी (Porn films case) प्रकरणात त्याला (Raj Kundra Arrested) अटक करण्यात आली. राज कुंद्रावर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पॉर्न चित्रपट (Porn Movies) तयार करून विकल्याच आरोप आहे. राजविरूद्ध आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राजने आपल्या एका नातलगासोबत मिळून एक कंपनी सुरू केली होती. ही कंपनी पॉर्न कंटेंटसाठी अनेक एजंटला कॉन्ट्रॅक्ट द्यायची, असा देखील आरोप आहे. यावरून सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावरून अनेक चर्चांचे पडसाद उमटत आहेत. अशातच आता गूगल (Google data) कंपनीने एक मोठा खुलासा समोर आणला आहे.

या खुलास्यावरून गुगलच्या डेटामध्ये (Google’s data) भारतीय (Indian) मोठ्या संख्येने पॉर्न (Porn) बघत असल्याचं समोर आलं आहे.
मुख्यतः तर भारतीय कोणत्या वेळेस सर्वाधिक पॉर्नसंदर्भात सर्च करतात
याची आकडेवारी देखील उघड झाली आहे.
राज कुंद्राला अटक करण्याआधीच पॉर्नसंदर्भात भारतीयांनी गुगल करण्याबद्दलचा
डेटा (data) एका विशिष्ट प्रकारचा ट्रेण्ड फॉलो करत असल्याचे दिसते.
गुगल ट्रेण्डवर (Google Trends) 14 जुलै ते 21 जुलैदरम्यानचा अर्थात आठवड्याभराचा डेटा बघितल्यास असं समजतं की, भारतीय हे रात्रीच्या वेळेस पॉर्नसंदर्भात सर्वाधिक सर्च करतात.
तर विशेष म्हणजे रात्री साधारण दीड वाजता सर्च करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण जास्त आहे.
दरम्यान, रात्री साडे नऊपासून पॉर्नसंदर्भातील (Porn) सर्चचा ग्राफ (Search graph) वर जाऊ लागतो आणि दीडच्या आसपास सर्वाधिक पातळी गाठतो.
यांनतर पहाटे साडेपाचपासून ग्राफ पुन्हा खाली जात असल्याचं देखील गुगल ट्रेण्डमध्ये (Google Trends) पाहायला मिळतं.

या दरम्यान, भारतातील (Indian) राज्यातील पॉर्न ही टर्म सर्वाधिक सर्च करणाऱ्या राज्यांमध्ये आश्चर्यकारकरित्या पूर्वेकडील राज्य (State) आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
तर, प्रथम मणिपूर, द्वितीय मिझोरम आणि तृतीय नागालँड ही 3 राज्ये पॉर्नसंदर्भात सर्च करण्यामध्ये आहेत. तसेच, त्या खालेखाल टॉप 5 मध्ये असणारी अन्य 2 राज्ये देखील पूर्वेकडील राज्यांपैकीच आहेत.
अरुणाचल प्रदेश 4 थ्या तर आसाम 5 व्या स्थानी आहे.
त्यांनतर अनुक्रमे मेघालय, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरचा क्रमांक सर्वाधिक
पॉर्न सर्च करणाऱ्या यादीमध्ये आहे. पंजाब-11, त्रिपुरा- 12, पश्चिम बंगाल-13,
अदमान निकोबार-14, गुजरात-15, उत्तर प्रदेश-16, उत्तराखंड-17,
राजस्थान-18, बिहार,19, छत्तीसगड-20, तसेच, अनुक्रमे 21 ते 25 झारखंड,
हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली, ओडिशा, महाराष्ट्र-26, यांनतर अनुक्रमे गोवा,
दादरा नगर हवेली, केरळ आणि दिव दमण यांचा क्रमांक लागतो.

Web Title : Google Data | porn search by indians in maximum at 1 30 am in night shows google trend data

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nana Patole | काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार, राहुल गांधीसोबत झालेल्या बैठकीत निर्णय; नाना पटोलेंची माहिती