Govt Bank FD Interest Rate | या सरकारी बँका देत आहेत, ७% पेक्षा जास्त व्याज, आता FD केल्यावर मिळतोय मोठा रिटर्न

नवी दिल्ली : Govt Bank FD Interest Rate | बँकिंग क्षेत्राच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, मागील ९ महिन्यांच्या कालावधीला एफडीमध्ये वाढीचा काळ म्हणणे चुकीचे ठरणार नाही. २०२२ च्या मे महिन्यानंतर, आरबीआयने वारंवार रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दरात वाढ झाल्यानंतर देशातील बहुतांश बँकांनी त्यांच्या फिक्स डिपॉझिट (FD) रेटमध्ये वाढ केली आहे. यामध्ये कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे. या बँका ग्राहकांना ७% पेक्षा जास्त व्याज (Govt Bank FD Interest Rate) देत आहेत, जे भारतातील महागाई दरापेक्षा कितीतरी जास्त आहे. या बँका वेगवेगळ्या कालावधीसाठी देत असलेल्या व्याजदरांची माहिती जाणून घेवूया.

कॅनरा बँक एफडी दर
कॅनरा बँक ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षांसाठी २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी ३.२५% ते ७% पर्यंत व्याज देत आहे. बँकेचे वाढलेले व्याजदर १९ डिसेंबरपासून लागू आहेत. व्याजदरातील वाढीनंतर कॅनरा बँक ७ दिवस ते ४५ दिवसांच्या एफडीवर ३.२५%, ४६ ते ९० दिवसांच्या एफडीवर ४.५०%, ९१ दिवस ते १८९ दिवसांच्या एफडीवर ४.५०%, १८० ते २६९ दिवसांच्या एफडीवर ५.५०%. २७० दिवसांपासून १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ५.५०%, १ वर्षाच्या एफडीवर ६.७५%, १ वर्षापेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी एफडीवर ६.८०%, ६६६ दिवसांच्या एफडीवर ७%. २ वर्षापेक्षा जास्त आणि ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ६.८०%, ३ वर्षांपेक्षा जास्त आणि ५ वर्षांपेक्षा कमीच्या एफडीवर ६.५०%, आणि ५ वर्षांपेक्षा जास्त आणि १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर ६.५०% व्याजदर देत आहे. (Govt Bank FD Interest Rate)

पंजाब नॅशनल बँक एफडी दर
पंजाब नॅशनल बँकेने १ जानेवारी २०२३ पासून १ वर्ष, १ वर्ष ते ६६५ दिवस, ६६७ दिवस ते २ वर्ष आणि २ वर्षांवरील आणि ३ वर्षांपर्यंतचे एफडी दर बदलले आहेत. व्याजदरातील या बदलानंतर, बँक १ वर्षाच्या एफडीवर ६.७५%, १ वर्षापेक्षा जास्त आणि ६६५ दिवसांच्या एफडीवर ६.७५%, ६६६ दिवसांच्या एफडीवर ७.२५%, ६६७ दिवस ते २ वर्षांच्या वरील एफडीवर ६.७५% व्याज देईल.

बँक ऑफ बडोदा एफडी दर
बँक ऑफ बडोदा २६ डिसेंबरपासून ३९९ दिवसांसाठी ‘बडोदा तिरंगा प्लस डिपॉझिट स्कीम’ अंतर्गत ७.०५% व्याज
देत आहे. बँक आपल्या सामान्य ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या एफडीवर ३% ते ६.७५% व्याज देत आहे.
दुसरीकडे, बँक ऑफ बडोदा देखील ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना एफडीवर अतिरिक्त ५० बेस पॉइंट्स व्याज देत आहे.
दुसरीकडे, बँक ५ वर्षे आणि त्याहून अधिक कालावधीच्या कर बचत एफडीवर ६.२५% व्याज देत आहे.

Web Title :- Govt Bank FD Interest Rate | story these government banks are giving interest rate of more than 7 persent on fd

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rashmika Mandanna | ट्रोलर्सला अभिनेत्री रश्मिका मंदानाने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…

Apurva Nemlekar | अपूर्वासाठी केलेल्या बॅनरबाजीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; ‘भरघोस मतदान करून…’

IND VS SL | तिसऱ्या T-20 सामन्यात कोण मारणार बाजी? कधी, कुठे पहाल सामना?