Black Fungal Infection : ब्लॅक फंगल इन्फेक्शनमुळे रूग्णांना का गमवावे लागताहेत डोळे?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात सुरू असलेल्या दुसर्‍या लाटेशी लोक लढत असतानाच आता ब्लॅक फंगल संसर्गाचा धोका सुद्धा लोकांना त्रस्त करू लागला आहे. कोविड-19 पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये ब्लॅक फंगल संसर्गाची प्रकरणे सुद्धा वेगाने वाढत आहेत.

डोळ्यांचे सर्जन म्यूकोरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगल संसर्गाच्या प्रकरणांचा उपचार करत आहेत, त्यांना आपल्या रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचे डोळे काढण्यासारखा कठिण निर्णय घ्यावा लागत आहे. बहुतांश प्रकरणात एक डोळा काढणे पुरेसे असते, परंतु काही प्रकरणात दोन्ही डोळे नाईलाजाने काढले जातात. हा संसर्ग गंभीर तेव्हा होतो जेव्हा सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. सोबतच मोर्केटमध्ये अ‍ॅम्फोटेरिसीन बी ची कमतरता असल्याने सुद्धा या संसर्गाची प्रकरणे गंभीर होत चालली आहेत.

पारस हॉस्पिटल, गुरुग्रामच्या ईएनटी डिपार्टमेंटचे चीफ डॉ. अमिताभ मलिक यांचे म्हणणे आहे की, हे इन्फेक्शन बहुतांश डायबिटीज रूग्ण आणि ज्यांची इम्युनिटी कमज़ोर असते त्यांच्यात होते. जेव्हा एखाद्या डायबिटीजच्या रूग्णाला कोरोना होतो तेव्हा त्यास एक स्टेरॉइड दिले जाते, जे इम्युनिटी कमजोर करते आणि शुगर लेव्हल वाढवते. सामान्य कोरोना रूग्णांना हे इंजेक्शन दिले जात नाही. हे कोविड इन्फेक्शनचे नवीन रूप आहे.

ते म्हणाले, सर्व मृत आणि संक्रमित टिश्यू हटवणे आणि अँटी-फंगल थेरेपीद्वारे उपचार केला जातो. स्टेरॉईडचा मोठ्या कालावधीपर्यंत वापर आणि टोसीलिजुमाबचा वापर करणे मुख्य कारण आहे. आम्ही 30 पैकी 2 तरूणांचे ऑपरेशन केले आहे.

सुरुवातीची लक्षणे :  दातांमध्ये वेदना, डोळ्यांमध्ये सूज, सायनसायटिस, लटकलेल्या पापण्या, डबल प्रतिमा दिसणे, दृष्टी कमी होेण, चेहर्‍याच्या एका बाजूला वेदना होणे, नाकाची त्वचा काळी किंवा गडद होणे, दात खिळखिळे होणे आणि छातीत वेदना.