Govt New Guideline For Serious Patients : गंभीर आजाराने पीडित असलेले रूग्ण कधी घेऊ शकतात लस, जाणून घ्या सरकारची नवीन गाईडलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आरोग्य मंत्रालयाने नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ व्हॅक्सीन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 (एनईजीव्हीएसी) च्या शिफारसी मान्य करत म्हटले आहे की, ज्या लोकांना कोरोना संसर्ग झालेला नाही परंतु ते अन्य एखाद्या आजाराने पीडित असतील किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल किंवा आयसीयूमध्ये दाखल आहेत, असे लोक बरे झाल्याच्या 4-8 आठवड्यानंतर व्हॅक्सीन घेऊ शकतात.

प्लाझ्माने उपचार करणारे कधी घेऊ शकतात व्हॅक्सीन :

गाईडलाईनमध्ये म्हटले आहे की, ज्या रूग्णांना प्लाझ्मा दिला गेला आहे असे रूग्ण सुद्धा लस घेऊ शकतात. असे रूग्ण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याच्या तीन महिन्यानंतर व्हॅक्सीन घेऊ शकतात.

संक्रमित झाल्याच्या किती दिवसानंतर व्हॅक्सीन घ्यावी :

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, जे लोक कोविड-19 ने संक्रमित झाले आहेत किंवा लसीचा पहिला डोस घेल्यानंतर संक्रमित झाले आहेत त्यांनी संसर्गातून पूर्ण बरे झाल्याच्या तीन महिन्यानंतरच लस घ्यायची आहे.

बाळाला स्तनपान देणार्‍या महिलांनी कधी व्हॅक्सीन घ्यावी :

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्या महिला स्तनपान देतात त्यांनाही सुरक्षेची आवश्यकता आहे अशा महिलांनी सुद्धा व्हॅक्सीन आवश्य घ्यावी.

व्हॅक्सीन घेतल्यानंतर रक्तदान कधी करू शकता :

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, जर एखादा व्यक्ती कोरोनाने संक्रमित झाला आहे तर तो आरटी-पीसीआर टेस्ट केल्याच्या 14 दिवसानंतर रक्तदान करू शकतो. अशाच प्रकारे जो व्यक्ती कोविड-19 ची व्हॅक्सीन घेत आहे, तर असा व्यक्ती व्हॅक्सीन घेतल्याच्या 14 दिवसानंतर रक्तदान करू शकतो.