Hemant Rasane On Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांचं काम दाखवा, हजार रुपये मिळवा; भाजप नेते हेमंत रासनेंची नागरिकांना ऑफर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Hemant Rasane On Ravindra Dhangekar | सध्या लोकसभा निवडणुकीत (Pune Lok Sabha) प्रत्येक उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु असून पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आमदार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) वसंत मोरे (Vasant More) तर एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके (Anis Sundke) या चार उमेदवारांकडून प्रचार केला जात आहे. यावेळी प्रत्येक उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.(Hemant Rasane On Ravindra Dhangekar)

आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत कसबा विधानसभा मतदार संघाने निर्णायक भूमिका बजावली. कारण हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणूकीत मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर हे फ्लेक्सबाजी मधून एकमेकांवर निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळालं. याच दरम्यान मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यावर हेमंत रासने यांनी निशाणा साधला आहे.

मुरलीधर मोहोळ रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील

हेमंत रासने म्हणाले, पुणे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आतापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा
यंदाच्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील. 13 महिन्यापूर्वी रविंद्र धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघात
अपघाताने निवडून आले. त्या निवडणुकीत सर्व पक्ष एकत्रित आले. त्यामुळेच रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला.

काम दाखवा, हजार रुपये मिळवा

रासने पुढे म्हणाले, माझा पराभव झाल्यावर मी दोन दिवसांनंतर मतदार संघातील प्रत्येक भागात जाऊन काम करत आहे. या संपूर्ण कालावधीत रविंद्र धंगेकर यांनी केवळ फ्लेक्सबाजी करण्यावरच भर दिला आहे. मागील 13 महिन्यांच्या कालावधीत माझ्याकडे जवळपास दोन हजारांहून अधिक तक्रारी आल्या. त्या सर्व तक्रारींचं निवारण करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मी आज एकच सांगू इच्छितो की, रविंद्र धंगेकर यांचं काम दाखवा, हजार रुपये मिळवा, अशी ऑफर नागरिकांना देत रासने यांनी धंगेकर यांना टोला लगावला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vikas Thackeray On BJP Modi Govt | जनतेत मोदी व भाजप विरोधी लाट; नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांचे मत

Prithviraj Chavan In Pune | संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायम कटिबद्ध – पृथ्वीराज चव्हाण