Home Loan Tips | पहिल्यांदा घर खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग उपयोगी पडतील ‘या’ 5 होम लोन टिप्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Home Loan Tips | घर खरेदी करणे हे एखादे स्वप्न पूर्ण होण्यापेक्षा कमी नाही. जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, आणि यासाठी होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर अगोदर काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या. आम्ही अशा काही टिप्स (Home Loan Tips) सांगणार आहोत ज्यामुळे चांगली होम लोन डील मिळवण्यासाठी मदत होऊ शकते.

1. क्रेडिट स्कोअर जाणून घ्या

उत्कृष्ट क्रेडिट रेटिंगच्या आधारावर चांगल्या व्याजदरावर मोठ्या होम लोनचा लाभ घेऊ शकता. क्रेडिट स्कोअर 800 बेसिक पॉईंटच्यावर चांगला मानला जातो. यानंतर सर्व कागदपत्र एकत्रित करा.

ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, प्राप्तीकर रिटर्न, सॅलरी स्लीप, बँक स्टेटमेंट, कंपनीचे प्रमाणपत्र इत्यादी जमवा. घेणार असलेल्या संपत्तीसंधीत कागदपत्र जसे की विकणार्‍याची ओळख आणि पत्त्याचा पुरावा, संपत्तीचे टायटल, नकाशा, पूर्ण प्रमाणपत्र इत्यादी तयार ठेवा.

2. जॉईंट होम लोन

जॉईंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे कर्जपात्रता वाढते. गृहकर्ज परतफेडीवर कर कपातीचा दावा करता येतो, महिला जर सहअर्जदार असेल तर काही बँका महिलांना कमी व्याजदराने कर्ज देतात, शिवाय कर्ज फेडण्याची जबाबदारी दोन्ही व्यक्तींवर येते.

3. कमीत कमी व्याजदर

कमीत कमी व्याजदर असलेले कर्ज घेतले तर तुमचे वाचणारे पैसे गृहकर्जात मदत करू शकतात.

4. कागदपत्रांच्या सर्व डिटेल वाचा

कर्ज देणार्‍या संस्था कर्ज देण्यापूर्वी असंख्य कागदांवर सही करून घेतात.
हे कागद वाचणे अवघड असले तरी वेळ काढून ते वाचून घ्या.
यातील काही अटी तुमच्याविरूद्ध असू शकतात.

 

5. डाऊन पेमेंट जास्त आणि कर्ज कालावधी कमी करा

सामान्यपणे कमीत कमी 20%डाऊन पेमेंटची अपेक्षा केली जाते.
किंवा कर्जदाराने पैसे भरणे अनिवार्य असते. मात्र, आर्थिक विवेक हे सांगतो की, कर्ज घेणार्‍याने संपत्ती मुल्याच्या 50-60% डाऊन पेमेंट करण्याचा प्रयत्न करावा.
तसेच शिल्लक रक्कम होम लोन म्हणून फेडावे.

डाऊन पेमेंट जेवढे जास्त असेल व्याजाचा भार तेवढाच कमी होईल.
अनेक कर्ज देणार्‍या बँका परतफेडीसाठी 30 वर्षापर्यंतचा मोठा कालावधी देतात.
परंतु तुम्ही 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी निवडणे टाळा. याचे कारण हे आहे.
की, मोठ्या कालावधीत एका कर्जदाराला व्याजाच्या रूपात खुप जास्त पैसे भरावे लागतात आणि व्याजदरात अस्थिरतेच्या जोखमीचा सामना सुद्धा करावा लागतो.

 

Web Title : Home Loan Tips | home loan buying tips thinking of buying a home for the first time these 5 home loan tips will be help you

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Minister Nitin Raut | पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा

Ginger | आले वजन कमी करते, दररोज ‘या’ पध्दतीनं सेवन करा, जाणून घ्या

Shanidev | ‘274’ दिवस ‘या’ राशीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक; शनीच्या अशुभ परिणामामुळे होऊ शकते ‘हे’ नुकसान