केरळमध्ये १ जून पासून इंधनावरील कर रद्द

केरळ : वृत्तसंस्था

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर पेट्रोलच्या वाढीचा आलेख वाढतच गेला. मात्र आता सर्वसामान्यांकडून दरवाढीच्या विरोधात निदर्शने होत असल्याने, अखेरीस केरळमध्ये १ जूनपासून पेट्रोल आणि डिझेलवरील कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पेट्रोल-डिझेल दर लिटरमागे एका रुपयाने कमी होईल. इंधनावरील कर रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासोबतच इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असताना, त्यावरील कर रद्द करण्याचा निर्णय घेणारे केरळ हे पहिले राज्य ठरले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य संताप व्यक्त करत असताना केरळ सरकारने इंधनावरील स्टेट टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमध्ये सध्या पेट्रोलवर ३२.०२ टक्के कर लावला जात असून, डिझेलवर २५.५८ टक्के टॅक्स लावला जातो. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलवर १ टक्के सेसही लावला जातो. मात्र आता कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्या कारणाने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती घसरणार आहेत. १ जूनपासून हा निर्णय लागू होईल.

सध्या केरळमध्ये पेट्रोलचा दर ८२.६१ रुपये असून, डिझेलचा दर ७५.१९ रुपये आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कर रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेल जवळपास २० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र राज्य सरकारने यासंबंधी अधिकृत माहिती दिलेली नाही.

इतर सर्व राज्यांचा विचार करता सर्वाधिक पेट्रोल डिझेलचा दर महाराष्ट्रात आहे. त्यातही पुणे ,मुंबई ,अमरावती ,नागपूर जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल -डिझेल मिळते. केरळ सरकारच्या निर्णयानंतर आता महारष्ट्रातही पेट्रोल -डिझेल चे दर कमी व्हावेत अशी अशा आहे.